अहमदनगर : ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या 25 कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. त्याच वेळी, उत्तर प्रदेश या निवडणूक राज्यात ई-श्रमिक कार्ड मिळालेल्या कामगारांची संख्या 8 कोटींच्या पुढे गेली आहे. ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत 24 कोटी 85 लाख 8 हजार 271 लोकांनी नोंदणी केली आहे.
देशात असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी आहे. केंद्र सरकारने या कामगारांसाठी एक चांगला उपक्रम सुरू केला आहे. या कामगारांची ऑनलाइन नोंदणी करुन त्यांना ई श्रम कार्ड देण्यात येत आहे. या कार्डच्या माध्यमातून कामगार वर्गास अनेक फायदे मिळणार आहेत, तसेच सरकारी योजनांचाही लाभ मिळणार आहे. यामध्ये ई-श्रमिक कार्डधारकांना 2 लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळते. हे कार्ड तयार झाल्यानंतर मजुरांना रोजगार मिळण्याची शक्यता लक्षणीय वाढते.
कार्डच्या मदतीने कामगार भारत सरकारच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ घेऊ शकतात. आतापर्यंत कोट्यावधी कामगारांनी नोंदणी केली आहे, तरी देखील अजून अनेक कामगार असे आहेत की ज्यांची नोंदणी झालेली नाही. जर तुम्ही ई-श्रम कार्ड बनवले तर तुम्हाला त्यामध्ये 2 लाख रुपयांचे मोफत विमा संरक्षण मिळते. हे कार्ड बनवून तुम्ही याचा फायदा घेऊ शकता.
ई-श्रम कार्डधारकाला कामगार विभागाच्या सर्व योजना मिळतात, जसे की मुलांची स्कॉलरशीप, मोफत सायकल, मोफत शिलाई मशीन इत्यादी. याशिवाय केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांचा लाभही मिळणार आहे. ई-श्रम कार्डधारकांना भविष्यात इतर अनेक फायदे मिळतील. वास्तविक, भविष्यात या योजनेशी रेशन कार्ड जोडले जाईल, ज्याद्वारे लोकांना कोणत्याही रेशन दुकानातून रेशन मिळू शकेल. दुसरीकडे, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ थेट ई-श्रम कार्डधारकांना मिळणार आहे.
तुम्हाला तुमचे ई-श्रम कार्ड बनवायचे असेल, तर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकता. दुसरे म्हणजे, तुम्ही जवळच्या कोणत्याही सार्वजनिक सेवा केंद्र, CSC आणि पोस्ट ऑफिसमधून बनवलेले ई-श्रम कार्ड देखील मिळवू शकता.
‘ई श्रम’ कार्डचे फायदे अनेक; जाणून घ्या, नोंदणी करण्यासाठी महत्वाची माहिती..