Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. लवकरच देशात येताहेत ‘हे’ 6 जबरदस्त स्मार्टफोन.. पहा, कधी येतील मार्केटमध्ये..

मुंबई : पुढील सात ते आठ दिवसात अनेक उत्कृष्ट स्मार्टफोन देशातील फोन मार्केटमध्ये लाँच होणार आहेत. यामध्ये सॅमसंग, विवो आणि रेडमीच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. या सर्व स्मार्टफोन्स लाँच 9 फेब्रुवारीला होणार आहे. या दरम्यान, Samsung Galaxy S22 सीरीजचे दोन स्मार्टफोन लाँच केले जातील. तर Redmi Note 11 आणि Vivo 1T 5G स्मार्टफोन लाँच केले जातील. याबद्दल आधिक माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

रेडमी नोट 11
Redmi Note 11 मध्ये 6.4 इंच AMOLED डिस्प्ले दिला जाईल. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 सेट सपोर्टसह येईल. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सपोर्ट दिला जाईल. त्याचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असेल. याशिवाय 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि दोन 2 मेगापिक्सल सेन्सर दिले जाऊ शकतात. सेल्फीसाठी 13-मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल. हा फोन 9 फेब्रुवारी रोजी लाँच होणार आहे.

Advertisement

Redmi Note 11S
Redmi Note 11S स्मार्टफोन 6.4 इंच फुल एचडी प्लस डिस्प्लेसह येईल. फोन Mediatek Helio 96 सेट सपोर्ट सह येईल. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सेल असेल. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलची लेन्स दिली जाईल. फोनला 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Advertisement

Vivo 1T 5G
विवो एक नवीन मालिका घेऊन येत आहे. या मालिकेतील पहिला स्मार्टफोन Vivo 1T 5G असेल. देशात 9 फेब्रुवारीला लाँच होणार आहे. Vivo 1T 5G फोनची किंमत 20 हजार रुपये असू शकते. हा सर्वात वेगवान स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला जाईल.

Loading...
Advertisement

Samsung Galaxy S22
हा या मालिकेतील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. Galaxy S22 स्मार्टफोन Exynos 2200 SoC सेटसह सादर केला जाईल. फोन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. फोनमध्ये 6.1 इंच डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले असेल.

Advertisement

Samsung Galaxy S22+
Samsung Galaxy S22+ बाकीचे स्पेसिफिकेशन सारखेच दिले जाऊ शकतात. पण हा फोन सर्वात मोठ्या डिस्प्ले सपोर्टसह दिला जाण्याची शक्यता आहे. फोन मोठ्या बॅटरीसह येण्याची शक्यता आहे.

Advertisement

Samsung Galaxy S22 Ultra
Galaxy S22 मालिकेतील वैशिष्ट्ये समान असतील. तथापि, कॅमेराच्या बाबतीत बदल दिसू शकतात. यामध्ये सर्वात प्रीमियम कॅमेरा फोन दिला जाऊ शकतो.

Advertisement

अरे वा.. ‘या’ दिग्गज कंपनीचा पहिलाच 5G स्मार्टफोन घेतोय एन्ट्री; पहा, काय आहेत फिचर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply