एलआयसीने विमाधारकांना दिलीय खुशखबर..! बंद पडलेली पॉलिसी पुन्हा करता येईल सुरू; वाचा, काय होणार फायदा
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने लॅप्स झालेली वैयक्तिक विमा पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. LIC ने शनिवारी एका प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, प्रीमियम भरण्याच्या कालावधीत ज्या पॉलिसी बंद पडल्या आहेत, ज्यांचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाला नाही, अशा पॉलिसी या मोहिमेत पुन्हा चालू केल्या जाऊ शकतात.
ही मोहीम 7 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू होईल आणि पुढील महिन्यात 25 मार्च 2022 पर्यंत चालवली जाईल. भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक आहे, जी 1956 मध्ये सुरू झाली होती.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने सांगितले की, “कोविड-19 संकटाने विमा संरक्षणाच्या गरजेवर भर दिला आहे आणि एलआयसी पॉलिसीधारकांसाठी त्यांची बंद पडलेली पॉलिसी पुन्हा अॅक्टिव्ह करणे, जीवन संरक्षण पुनर्संचयित करणे आणि आपल्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्याची ही एक उत्तम संधी आहे. एलआयसीने म्हटले आहे की, बंद पडलेली पॉलिसी पुन्हा अॅक्टिव्ह केल्यावर चार्जमध्ये 20 ते 30 टक्के सूट दिली जात आहे. या अंतर्गत, तुम्ही लेट फी रूपात कमाल 3000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. तर सूक्ष्म विमा योजनांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तथापि, टर्म प्लॅन आणि जास्त जोखीम विमा योजनांवर अशी सूट दिली जाणार नाही.
याशिवाय पॉलिसी पुन्हा अॅक्टिव्ह करण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय अहवालात कोणताही दिलासा दिला जाणार नाही. परंतु आरोग्य आणि सूक्ष्म विमा योजनांमध्ये उशीरा प्रीमियम भरण्यावर आकारले जाणारे शुल्क माफ केले जाईल. ज्या विमा पॉलिसींसाठी गेल्या 5 वर्षांपासून प्रीमियम भरलेला नाही, अशा पॉलिसी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या या मोहिमेअंतर्गत पुन्हा सुरू केल्या जाऊ शकतात.
दरम्यान, एलआयसीच्या या अभियानातून संबंधित विमाधारकांचाही फायदा होणार आहे. काही कारणांमुळे पॉलिसी बंद पडली होती. आता मात्र, पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची एक संधी एलआयसीने उपलब्ध करुन दिली आहे.
कधी येणार ‘एलआयसी’ चा ‘आयपीओ’..? सरकारने दिलेय उत्तर.. जाणून घेण्यासाठी वाचा महत्वाची माहिती..