Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोने-चांदी बाजारभाव : आज पुणे-मुंबईत काय आहे सोन्याचा भाव..? येथे मिळवा अपडेट..

मुंबई : काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर कमी जास्त होत आहेत. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यानंतर मात्र दरात वाढ झाली. आज देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 200 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 45 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे. तसेच पुणे शहरात 24 कॅरेटसाठी 49 हजार 60 रुपये तर 22 कॅरेटसाठी 45 हजार 50 रुपये असा भाव आहे.

Advertisement

शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोने दर 47,918 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्या आधीच्या सत्रात गुरुवारी सोन्याचा भाव 47,884 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. एचडीएफसी सिक्योरिटीजने या रेटबबात माहिती देताना सांगितले, की सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीत झालेल्या वाढीमुळे सोने दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

Goodreturns वेबसाइटनुसार आज मुंबईत चांदीचा दर एक किलोसाठी 61000 रुपये आहे. तर पुण्यातही एक किलो चांदीचा भाव 61000 रुपये आहे. शुक्रवारी चांदीच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली होती. या वाढीसह चांदीचा दर 61,006 रुपये प्रति किलो ग्रॅमवर बंद झाला होता. त्याआधीच्या सत्रात गुरुवारी हा दर 60,676 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता.

Loading...
Advertisement

दरम्यान, आपल्या देशात सोने हा उत्तम गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. यामुळेच भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. गेल्या काही दिवसांपासून एखादा अपवाद वगळता सोन्याच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याची किंमत 48 हजारांच्या आसपास आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे आणि पुढील 12 महिन्यांत सोन्याचे दर सर्वकालिक सर्वाधिक दराचा टप्पा पार करतील.

Advertisement

ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते. भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. सध्या देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेच्या काळात सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे. याबरोबरच गुंतवणूकदार पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. यामुळेच सोन्याच्या आयातीबरोबरच भौतिक सोने आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे. तज्ज्ञही सोन्यात गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ सांगत आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या 12 ते 15 महिन्यांत सोन्याचा भाव 56,000 रुपयांचा सार्वकालिक टप्पा पार करेल.

Advertisement

आज सोने-चांदीचा ट्रेंड बदलला.. सोने खरेदीआधी चेक करा सोन्या-चांदीचे नवीन भाव..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply