Take a fresh look at your lifestyle.

नव्या वर्षात केंद्र सरकारला झटका देणारी बातमी.. पहा, कशामुळे घटलाय पैशांचा साठा..?

मुंबई : नव्या वर्षात देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात 4.531 अब्ज डॉलरची घट झाली आहे. 28 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात चलन साठा $629.755 अब्ज पर्यंत खाली आला आहे. रिजर्व बँकेकडून ही माहिती मिळाली आहे. शुक्रवारी रिजर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 21 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा $67.8 अब्जने घसरून $634.287 अब्ज झाला होता. तर 3 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात चलन साठा विक्रमी $642.453 अब्ज इतका होता.

Advertisement

RBI च्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 28 जानेवारी रोजी संपलेल्या अहवाल आठवड्यात परकीय चलन साठा कमी होण्याचे कारण म्हणजे एकूण परकीय चलनाचा महत्त्वपूर्ण भाग मानल्या जाणार्‍या परकीय चलन मालमत्ता (FCA) मध्ये झालेली घट. बँकेच्या आकडेवारीनुसार, या आठवड्यात परकीय चलन मालमत्ता साठा 3.504 अब्ज डॉलरने कमी होऊन $ 566.077 अब्ज झाला आहे.

Advertisement

डॉलरमध्ये व्यक्त केलेल्या परकीय चलनाच्या मालमत्तेमध्ये यूरो, पौंड आणि येन यांसारख्या गैर-अमेरिकन चलनाच्या चलनाचाही समावेश होतो. या कालावधीत सोन्याच्या साठ्याचे मूल्य 84.4 कोटी डॉलरने कमी होऊन $39.493 अब्ज झाले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सह स्पेशल ड्रॉइंग राइट किंवा SDR पुनरावलोकनाधीन आठवड्यात $14.1 कोटी डॉलरने घसरून $19.011 अब्ज राहिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे असलेला देशाचा चलन साठाही $4.2 कोटीने कमी होऊन $5.174 अब्ज झाला आहे.

Advertisement

येथे तीन सत्रांतील रुपयातील घसरण शुक्रवारी संपुष्टात आली. आंतरबँक परकीय चलन बाजारात शुक्रवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 19 पैशांनी सुधारून 74.69 वर पोहोचला. जगातील इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर कमजोर झाल्याने रुपया मजबूत झाला. या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपया 37 पैशांनी वधारला आहे.

Advertisement

नव्या वर्षात खुशखबर..! घटत चाललेला परकीय चलन साठा वाढला; फक्त सात दिवसात ‘इतक्या’ डॉलरची पडली भर

Advertisement
Advertisement

Leave a Reply