‘टेस्ला’ साठी देशाचे दरवाजे बंदच..! कंपनीच्या मागणीवर सरकारने दिलेय ‘हे’ उत्तर; जाणून घ्या..
नवी दिल्ली : टेस्ला ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कची कंपनी देशात आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी करात सवलत मागत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने टेस्लाला करात सवलत देण्यासाठी कंपनीसमोर काही अटी ठेवल्या आहेत. जर टेस्लाने सरकारच्या त्या अटी मान्य केल्या तर कंपनीस कर सूट मिळू शकते.
शुक्रवारी एका निवेदनात वित्त मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्ला देशातील स्थानिक पायाभूत सुविध नियमांची पूर्तता करत असल्यास आम्ही टेस्लाचे स्वागत करतो.” “टेस्ला किंवा इतर कंपन्यांना इलेक्ट्रिक वाहनांसाठी सवलतीच्या कर रचना आवश्यक असल्यास, काही अटींचे पालन करावे लागेल,” वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने एका निवेदनात म्हटले आहे.
वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याच्या टॅरिफ स्ट्रक्चरसह गुंतवणूक आधीच येत आहे आणि इतर परदेशी कंपन्या सध्याच्या टॅरिफ स्ट्रक्चरसह त्यांची इलेक्ट्रिक वाहने विकत आहेत. सध्याच्या टॅरिफ रचनेमुळे हा मार्ग इतरांसाठीही खुला आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी केंद्र सरकारला कर कमी करण्याचे आवाहन केले आहे आणि कंपनीला यापूर्वी इतरत्र उत्पादित वाहने स्पर्धात्मक किमतीत विकण्याची परवानगी द्यावी.
विशेष म्हणजे, देशात CBU वाहनांवर 25 ते 100 टक्के आयात शुल्क आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत टेस्ला कार प्रदर्शित केली होती. टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या योजनांवर चर्चा करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.
दरम्यान, एलन मस्क यांना केंद्र सरकारने टेस्ला कारवरील आयात शुल्क कमी करावे असे वाटते, जेणेकरून ते परदेशात बनवलेल्या टेस्ला कार भारतीय बाजारपेठेत सहज विकू शकतील. मात्र भारत सरकार यासाठी अजिबात तयार नाही. अलीकडेच केंद्र सरकारकडून मस्क यांच्या दबावाचा काहीही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले. सध्या, देशात 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या आयात केलेल्या कारवर 100% कर आकारणी होते, ज्यात विमा आणि शिपिंग खर्चाचा समावेश आहे आणि 30 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या कारवर 60 टक्के आयात कर आकारला जातो.
ऑटो मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत स्पर्धा करणे सोपे नाही. येथे टाटा आणि महिंद्रा सारख्या देशांतर्गत कंपन्यांसह, मारुती, ह्युंदाई, एमजी, मर्सिडीज, ऑडी आणि जेएलआर सारख्या कंपन्या आधीच त्यांच्या उत्पादनांसह बाजारात आहेत. अशा स्थितीत एक किंवा दोन मॉडेल्सच्या आधारे भारतीय बाजारपेठ टेस्लासाठी खूप आव्हानात्मक आहे.

‘टेस्ला’ ला बसलाय जबर झटका..! कंपनीने परत मागितल्या तब्बल 8 लाख कार; जाणून घ्या काय आहे कारण..?