Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून युरोपातील देशांनी ‘WTO’ कडे केलीय चीन विरोधात तक्रार; पहा, चीनमुळे कोणत्या संकटात सापडलेत हे देश..?

दिल्ली : चीनच्या कारवायांनी जगातील अनेक देश हैराण झाले आहेत. चीन आता अमेरिकेसाठीही धोकादायक ठरू लागला आहे. अमेरिकेप्रमाणेच युरोपातील देशांतही चीनविरोधात नाराजी वाढत चालली आहे. इतकेच नाही तर येथील काही देशांनी थेट जागतिक व्यापार संघटनेकडेच चीनविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

या मुद्द्यावर युरोप संघटनेने सांगितले, की लिथुआनियाशी भेदभाव केल्याबद्दल त्यांनी जागतिक व्यापार संघटनेकडे चीन विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या बाल्टिक देशाबरोबर चीनच्या भांडणामुळे इतर देशांच्या निर्यातीवरही परिणाम होत असल्याचे संघटनेचे (EU) चे म्हणणे आहे. वास्तविक, लिथुआनियाने चीनच्या विरोधाचा विचार न करता तैवानला आपल्या देशात तैवान या नावाने कार्यालय सुरू करण्यास परवानगी दिली होती. लिथुआनियाच्या या निर्णयामुळे चीन चांगलाच भडकला होता. त्यानंतर चीन या लहान देशाला सातत्याने त्रास देत आहे. या दोन्ही देशांच्या वादाचा परिणाम युरोपातील अन्य देशांवरही होत आहे. त्यामुळेच संघटनेने आक्रमक पवित्रा घेत चीनविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

लिथुआनियाला प्रत्युत्तर म्हणून संतापलेल्या चीनने लिथुआनियाच्या राजदूताला परत पाठवले तसेच तेथून आपला राजदूतही मागे घेतला. गेल्या महिन्यात लिथुआनियाने चीनच्या राजधानीतील आपला दूतावास बंद केला होता. तणाव वाढत असताना, लिथुआनियाने चीनवर आपल्या बॉर्डरवर व्यापारी माल थांबवल्याचा आरोप केला. त्यामुळे, आता संघटनेने हा मुद्दा जागतिक व्यापार संघटनेच्या निदर्शनास आणून दिला आहे.

Loading...
Advertisement

संघटनेचे कार्यकारी उपाध्यक्षांनी सांगितले, की जागतिक व्यापार संघटनेकडे कोणताही मुद्दा घेऊन जाणे म्हणजे किरकोळ गोष्ट ठरत नाही आणि आम्ही तसे समजतही नाही. याआधी अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतरही द्विपक्षीय पातळीवर हा मुद्दा निकाली काढता आला नाही. त्यामुळे आता हा वाद जागतिक व्यापार संघटनेकडे नेण्याव्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

बाब्बो.. चीन आता करतोय चोऱ्या; अमेरिकन कंपन्यांसाठी ठरतोय अत्यंत धोकादायक; पहा, कुणी केलाय ‘हा’ धक्कादायक खुलासा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply