Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

राहा तयार..! फेब्रुवारी महिन्यात येताहेत ‘इतक्या’ कंपन्यांचे स्मार्टफोन्स; पहा, काय आहेत फिचर

मुंबई : नव्या वर्षातील दुसऱ्या महिन्यात देशात काही स्मार्टफोन कंपन्यांचे स्मार्टफोन लाँच होणार आहेत. यामध्ये Redmi, Realme, Oppo आणि Vivo स्वतःचे स्मार्टफोन आणत आहेत. या फोन्समध्ये चांगला कॅमेरा सेटअप तर दिसेलच, पण हे मोबाइल किफायतशीरही आहेत. चला, तर मग कोणत्या कंपन्यांचे स्मार्टफोन मार्केटमध्ये येणार आहेत, याची माहिती घेऊ या..

Advertisement

Vivo T1 5G देशात लाँच होण्यासाठी सज्ज आहे. या मोबाइलमध्ये अनेक चांगले फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळतील. कंपनीने स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे. हा मोबाइल 25 हजार रुपयांच्या सेगमेंटमध्ये खरेदी करता येईल.

Advertisement

Oppo Reno 7 मालिकेतील स्मार्टफोन देशात लाँच होणारे पहिले फोन असतील. मात्र, या मालिकेअंतर्गत किती मोबाइल लाँच केले जातील याची अद्याप कंपनीने आधिकृत माहिती दिलेली नाही. Oppo Reno 7 Pro च्या कॅमेऱ्याबद्दल सांगितले तर बॅक पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये अल्ट्रा सेन्सिंग कॅमेरा देण्यात आला आहे, जो 32-मेगापिक्सेल कॅमेरा असेल.

Loading...
Advertisement

Samsung Galaxy S22 या महिन्यात येऊ शकतो. यामध्ये 6.8 इंच डिस्प्ले असू शकतो. हा फोन Exynos 2200 SoC किंवा Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 1 सह येईल. Samsung Galaxy च्या या मोबाइलमध्ये 128GB आणि 256GB स्टोरेज पर्याय मिळतील. तसेच, 12 GB पर्यंत रॅम मिळू शकते. यात 108 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. रिपोर्टनुसार, यामध्ये 40 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन 9 फेब्रुवारीला लाँच होईल, असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

Redmi 9 फेब्रुवारीला देशात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. याचे नाव Redmi Note 11S असू शकते. या सीरिज अंतर्गत आणखी बरेच मोबाईल लाँच केले जाऊ शकतात. Redmi Note 11S फोनमध्ये 108 मेगापिक्सेल ISOCELL HM2 सेन्सर दिला जाऊ शकतो.

Advertisement

लवकरच येतोय आणखी एका चीनी कंपनाचा स्मार्टफोन; सॅमसंगला टक्कर देण्याचा आहे प्लान.. चेक करा, डिटेल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply