Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारीच.. इलेक्ट्रिक व्हेइकल खरेदी करा अन् मिळवा 15 टक्के अनुदान; पहा, कुठे सुरू होणार ‘ही’ खास योजना

मुंबई : देशात हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढत चालली आहे. सरकारकडून होत असलेले प्रयत्नांमुळेही प्रोत्साहन मिळत आहे. आताही ओडिशा सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक खास योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशा राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर 15 टक्के सबसिडी जाहीर केली आहे. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, दुचाकींवर 15 टक्के मर्यादेसह 5,000 रुपये अनुदान असेल, तर तीनचाकी वाहनांना 15 टक्के मर्यादेसह 10,000 रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी 50 हजारांपर्यंत अनुदान मिळेल.

Advertisement

हे अनुदान 1 सप्टेंबरपासून लागू होणार असून ही रक्कम वाहन नोंदणीच्या वेळी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. वाणिज्य आणि परिवहन विभागाने सोमवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ही योजना 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू राहील. विक्री, खरेदी प्रोत्साहन, ठेवी आणि कर्जावरील अनुदानाशी संबंधित माहितीचे निरीक्षण करण्यासाठी एक पोर्टल तयार केले जाईल. NITI आयोगाच्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आणि ओडिशा इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 त्याच्या अनुषंगाने आहे.

Loading...
Advertisement

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सरकारने सर्व श्रेणीतील इलेक्ट्रिक वाहनांना नोंदणी शुल्क आणि मोटार वाहन करातून सूट देण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्य सरकारांनी आधीच EV धोरणे जाहीर केली आहेत, ज्यात सबसिडीचा समावेश आहे. 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये, बॅटरी स्वॅप पॉलिसीची घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्पेशल मोबिलिटी झोन ​​विकसित केले जातील. सार्वजनिक वाहतुकीमध्ये स्वच्छ तंत्रज्ञानाला चालना दिली जाईल. खाजगी क्षेत्राला बॅटरी बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल आणि सेमी कंडक्टरच्या उत्पादनासाठी उद्योग विकसित केला जाईल. त्यामुळे निर्यातीलाही चालना मिळेल.

Advertisement

वाव..एका चार्जवर मिळेल 312 किलोमीटर रेंज..! ‘या’ आहेत काही स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या, फिचर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply