Take a fresh look at your lifestyle.

नव्या वर्षात टाटांचे आणखी एक रेकॉर्ड..! पहिल्याच महिन्यात केलीय दमदार कामगिरी..

मुंबई : नव्या वर्षातील पहिल्याच महिन्यात देशातील आघाडीची चारचाकी कंपनी मारुती सुझुकीला जोरदार झटका बसला आहे. कंपनीची कार विक्री जानेवारी 2022 मध्ये 3.96 टक्क्यांनी घसरून 1,54,379 युनिट्सवर आली. मारुतीने मंगळवारी एका निवेदनात सांगितले की, जानेवारी 2021 मध्ये कंपनीने 1,60,752 वाहनांची विक्री केली होती. याशिवाय, गेल्या महिन्यात कंपनीची विक्री 8 टक्क्यांनी घसरून 1,36,442 मोटारींवर आली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 1,48,307 मोटारींची होती. इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरतेचा मुख्यतः देशांतर्गत बाजारात विक्री होणाऱ्या वाहनांच्या उत्पादनावर किरकोळ परिणाम झाला. हा प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही सर्व शक्य निर्णय घेत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Advertisement

दुसरीकडे स्वदेशी कंपनी टाटाने मात्र या महिन्यात जोरदार कामगिरी केली आहे. जानेवारी 2022 मध्ये टाटा मोटर्सची विक्री 27 टक्क्यांनी वाढून 76,210 युनिट झाली. यामध्ये आंतरराष्ट्रीय विक्रीचाही समावेश आहे. टाटा मोटर्सने मंगळवारी एका निवेदनात सांगितले, की कंपनीने जानेवारी 2021 मध्ये 59,866 वाहने विकली. जानेवारी 2022 मध्ये देशांतर्गत बाजारपेठेतील विक्री 26 टक्क्यांनी वाढून 72,485 युनिट्सवर पोहोचल्याचे कंपनीने म्हटले आहे. मागील महिन्यात ते 57,649 युनिट होते.

Advertisement

कंपनीने जानेवारी 2022 मध्ये एकूण 40,777 प्रवासी वाहने विकली, तर जानेवारी 2021 मध्ये 26,978 वाहनांची विक्री झाली होती. टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक वाहन विक्री जानेवारीमध्ये 5 पटीने वाढून 2,892 युनिट्स झाली. कंपनीने जानेवारी 2021 मध्ये 514 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. यामध्ये Tata Nexon EV आणि Tigor EV यांचा समावेश आहे. अलीकडेच कंपनीने सांगितले होते, की Tata Nexon EV च्या एकूण विक्रीने 13,500 युनिट्सचा टप्पा पार केला आहे आणि ही देशातील सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रिक कार ठरली आहे.

Advertisement

दरम्यान, देशातील वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी आज बजेटमध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या. देशाच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा 7.5 टक्के असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे क्षेत्र महत्त्वाचे मानले जाते. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन बॅटरी धोरण जाहीर करणे, वाहन घटकांच्या विकासासाठी संरक्षण संशोधन आणि विकासामध्ये खाजगी कंपन्यांना भागीदार बनवणे यासारख्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. यासह, सरकारने कृषी क्षेत्राला मदत करण्यासाठी 2.73 लाख कोटींचा MSP देखील जाहीर केला आहे, ज्यामुळे ग्रामीण बाजारपेठेत ऑटोमोबाइलची मागणी वाढण्यास मदत होऊ शकते.

Advertisement

टाटा-रिलायन्सला अदानी देणार जोरदार टक्कर; नव्या बिजनेस जगतात करणार पदार्पण..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply