Budget 2022 latest Updates: पहा काय महागणार आणि काय होणार स्वस्त; तेही एकाच क्लिकवर
दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात तरुणांना 60 लाख नोकऱ्यांचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचवेळी, एका वर्षात देशभरातील गरिबांसाठी 80 लाख परवडणारी घरे बांधली जातील. बजेटमध्ये अनेक गोष्टी महाग करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर काही गोष्टी स्वस्त केल्या जात आहेत. जाणून घ्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना कुठे दिलासा आणि कुठे खिसा खाली करायचे नियोजन झालेले आहे.
- काय महाग आणि काय स्वस्त होणार ते पहा :
- कापड, चामड्याच्या वस्तू स्वस्त होतील
- मोबाईल फोन आणि चार्जर स्वस्त होतील
- हिऱ्यांचे दागिने स्वस्त होतील
- शेती स्वस्त होईल
- पॉलिश्ड हिऱ्यांवरील कस्टम ड्युटी कमी
- परदेशी मशीन स्वस्त होतील
- इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होतील
- शूज स्वस्त होतील
- कृत्रिम दागिने महाग होतील
- छत्र्या महाग होतील
- स्टील स्वस्त होईल
- बटण, पॅकेजिंग बॉक्स स्वस्त होईल
- मिश्रणाशिवाय इंधन महाग होईल
- भांडवली वस्तू महाग होतील