Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Budget 2022 latest Updates: बजेट म्हणजे गाजराची पुंगी; पहा टिकैत यांच्यासह कोणी काय दिलीय प्रतिक्रिया

Please wait..

दिल्ली : आजच्या केंद्रीय बजेटबद्दल आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांनी बजेट खूप बेस्ट असल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी संमिश्र प्रतिक्रिया देताना याबद्दल बरे आहे अशी भावना व्यक्त केली आहे. यासह काहींनी यावर कडाडून टीका केली आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी बजेट म्हणजे गाजराची पुंगी असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

टिकैत म्हणाले की, अर्थसंकल्पाचा थोडाफार फायदा होतो, पण दाखवला तेवढा फायदा होत नाही, दाखवतो जास्त आणि मिळतो कमी. आम्ही म्हणालो एमएसपी हमी कायदा करा, या कायद्यामुळे कमी किमतीत पिकांची खरेदी थांबेल. सध्या याचा फायदा व्यापाऱ्यांना मिळत आहे, जे कमी भावात पिकांची खरेदी करतात आणि एमएसपीमध्ये महागड्या दरात विकतात. तर, मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. मध्य प्रदेशचे नेते कमलनाथ म्हणाले की, अर्थसंकल्पात बेरोजगारी, कृषी क्षेत्राबाबत काहीही नाही. बजेटमध्ये काय आहे? अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना काय दिलासा दिला आहे. बड्या उद्योगपतींना याचा फायदा होणार आहे. त्याचवेळी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट म्हणाले की, सरकारने कोरोनाच्या कालावधीनंतर असा अर्थसंकल्प सादर करायला हवा होता, जिथे मध्यमवर्गीय, छोटे दुकानदार, छोट्या व्यवसायांना मदत करण्यासाठी संसाधने आणि पैसा उपलब्ध करून दिला असता. महागाई आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी या अर्थसंकल्पात ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply