Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Budget 2022 : आता क्रिप्टोकरन्सीही रडारवर..! .. तर ‘त्या’ लोकांना द्यावा लागेल कर; पहा, काय म्हटलेय बजेटमध्ये

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करत 60 लाख नवीन रोजगारांची घोषणा केली आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, 16 लाख रोजगार आत्मनिर्भर भारतांतर्गत येतील, तर मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख रोजगार येतील. 5 राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकां दरम्यान, रोजगाराच्या आघाडीवर, सरकारने 60 लाख नवीन रोजगार देण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

अर्थमंत्री म्हणाले की, आव्हाने असली तरी आर्थिक स्थिती मजबूत आहे. सरकार डिजिटल अर्थव्यवस्था, फिनटेकला प्रोत्साहन देईल. LIC चा IPO लवकरच येणार आहे. एनपीएचा व्यवहार करण्यासाठी बॅड बॅंकेचे काम सुरू झाले आहे. पीपीपी मॉडेलद्वारे गुंतवणुकीत वाढ करणार आहोत. हा अर्थसंकल्प पुढील 25 वर्षांचे व्हिजन सादर करतो. सर्वसमावेशक वाढ, ऊर्जा परिवर्तन, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे याला प्राधान्य आहे. पंतप्रधान आवास योजनेत 80 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. पुढील 3 वर्षात 400 वंदे भारत ट्रेन सुरू होतील. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सेंद्रिय शेतीवर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना डिजिटल सेवा दिली जाणार आहे. पर्यावरणाबाबत मोठी पावले उचलली जातील. रेल्वेचे जाळे सुधारले जाईल.

Advertisement

टियर 2 आणि 3 शहरांच्या विकासासाठी काम सुरू आहे. 2047 पर्यंत देशातील निम्मी लोकसंख्या शहरांमध्ये राहणार आहे. शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीत वाढ करण्यावर भर दिला जाणार आहे. बॅटरीसाठी खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देईल.

Loading...
Advertisement

याशिवाय, परदेश प्रवासाला प्रोत्साहन देत सरकारने 2022-23 पर्यंत ई-पासपोर्ट जारी करण्याची घोषणा केली आहे. शहरी क्षेत्राच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद करून उत्कृष्ट केंद्रे स्थापन केली जातील. जर क्रिप्टोकरन्सी उपहार स्वरुपात देण्यात येत असेल तर क्रिप्टोकरन्सी घेणाऱ्या व्यक्तीस त्यावर कर भरावा लागेल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. RBI 2023 मध्ये डिजिटल चलन सुरू करणार आहे. डिजिटल मालमत्ता हस्तांतरणातून मिळणाऱ्या उत्पन्नावर सरकार 30 टक्के कर टाकणार आहे.

Advertisement

Budget 2022 latest Updates: मानसिक आरोग्यासाठी बजेटमध्ये मोठी तरतूद; पहा कसा होणार देशाला फायदा

Advertisement
Advertisement

Leave a Reply