मुंबई : आज मंगळवारी (1 फेब्रुवारी 2022) संसदेत आगामी आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकता प्रोत्साहनासाठी अनेक मोठ्या आणि महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पातील घोषणेमध्ये 60 लाख नवीन नोकऱ्यांचे आश्वासन दिले आहे. महत्वाचे मद्दे असे :
- आत्मनिर्भर भारत अंतर्गत 16 लाख नोकऱ्या देण्यात येणार आहेत.
- त्याचबरोबर मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख नोकऱ्या येतील.
- रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम नव्याने सुरू केले जातील.
- राष्ट्रीय कौशल्य पात्रता कार्यक्रम उद्योगांच्या गरजेनुसार तयार केला जाईल.
- आवश्यकतेनुसार राज्य चालवल्या जाणार्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांनाही अपग्रेड केले जाईल.
- देशाच्या विविध भागांतील शाळकरी मुलांचे शालेय शिक्षणाची दोन वर्षे साथीच्या रोगामुळे वाया गेली आहेत.
- DTH प्लॅटफॉर्मवर प्रधानमंत्री ई-विद्या योजनेंतर्गत एक चॅनल एक वर्ग योजना 12 वरून 200 टीव्ही चॅनल योजना वाढवली जाईल.
- इयत्ता पहिली ते बारावीच्या मुलांना त्यांच्या प्रादेशिक भाषेत शिक्षणाची सुविधा दिली जाईल.
- डिजिटल साधनांचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करता यावा यासाठी डिजिटल विद्यापीठाची स्थापना केली जाईल.
- टीव्ही, इंटरनेट, रेडिओ आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये दर्जेदार अध्यापन साहित्य उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून शिक्षकांना ई-सामग्री मिळू शकेल.
- शहरांमध्ये रोजगाराच्या संधी वाढविण्याचे काम केले जाईल.
- पाच सर्वोच्च शैक्षणिक संस्थांना सेंटर ऑफ एक्सलन्सचा दर्जा दिला जाईल.
- त्यांना 25 हजार कोटींचा विशेष निधी दिला जाणार आहे.
- AICTE या संस्थांसाठी प्राध्यापक आणि प्रशिक्षण कार्यक्रमांवर देखरेख करेल.
- दोन लाख अंगणवाड्या अत्याधुनिक करण्यात येणार आहेत.
- येत्या पाच वर्षांत 30 लाख अतिरिक्त रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन.
- Budget 2022 Updates: पहा अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे एकाच क्लिकवर; आरोग्य, शेती व रस्ते विकासाला प्राधान्य
- Budget 2022 latest Updates: LIC बाबत अर्थमंत्र्यांनी दिलेत मोठे संकेत..!
- Budget 2022 latest Updates: आयकर भरण्याच्या ‘त्या’ डोकेदुखीवर झालीय मोठी घोषणा..!