Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Budget 2022 latest Updates: आयकर भरण्याच्या ‘त्या’ डोकेदुखीवर झालीय मोठी घोषणा..!

Please wait..
Loading...

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2022) संसदेमध्ये सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात शहरी व ग्रामीण भाग यासह व्यावसायिक, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व गरीब घटकातील लोकांना खुश करण्याचे लक्ष्य या बजेटमध्ये आहे. तसेच आयकर भरताना झालेल्या चुकीला दुरुस्त करून झालेली डोकेदुखी कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अनेकांनी याचे स्वागत केले आहे.

Advertisement
RBI चे डिजिटल चलन : भारतात नियंत्रित डिजिटल चलन आणण्याची घोषणाही करण्यात आली आहे. बिटकॉईनसारख्या डिजिटल चलनात जोखमीच्या गुंतवणुकीच्या जागी नवीन सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय दिला जात आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक 2022-23 या आर्थिक वर्षात डिजिटल चलन सुरू करणार आहे.
कर दर कमी  : सहकारी संस्थांसाठी 18 टक्के कर दर 15 टक्के करण्याची घोषणा आणि अधिभार 12 टक्क्यांवरून 7 टक्के करण्याचा प्रस्ताव. तसेच उत्पन्नाचा आधारही 1 कोटी ऐवजी 10 कोटी करण्याचे जाहीर केले आहे.
आर्थिक नुकसानावर लक्ष : आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत वित्तीय तूट 4.5 टक्क्यांच्या खाली आणण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सर्व प्रभावी पावले उचलली जातील.
आयटीआर भरताना चूक झाली असेल तर दुरुस्त करण्याची संधी : जेव्हा आयकर विभागाला कळते की करदात्याने आयटीआर भरला नाही, तेव्हा दीर्घ प्रक्रिया सुरू होते. या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी कर भरताना झालेली चूक सुधारण्याची संधी दिली जाणार आहे. आता आयटीआर भरताना चूक झाली असेल तर दोन वर्षांसाठी ती सुधारण्याची संधी आहे.

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply