Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

BUDGET 2022 : बिजनेसमन व नोकरदारांना मिळणार ‘असा’ही दिलासा..? पहा नेमके काय असेल बजेट पेटीत

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) आज मंगळवारी कोरोना महामारीनंतरचे महत्वाचे बजेट सदर करणार आहेत. यात त्या उत्पन्न आणि व्यवसायात कमकुवत असलेल्या लोकांसाठी स्लॅब बदलून करदात्यांना दिलासा देऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांच्या या घोषणेकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.

Loading...
Advertisement

केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget) प्राप्तिकर स्लॅबमधील बदल किंवा कर नियमातील सवलती याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक बजेटमध्ये आयकर दर (Income Tax Slab) आणि स्लॅबचा आढावा घेतला जातो. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, अर्थमंत्री सीतारामन प्रत्येक क्षेत्राच्या गरजेनुसार सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करतील. याचा सर्वांना फायदा होईल. आजच्या अर्थसंकल्पाकडून सर्व क्षेत्रांच्या (शेतकऱ्यांसह) अपेक्षा असायला हव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०१४ पासून आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी कोरोना महामारीनंतर उत्पन्न आणि व्यवसायात कमकुवत असलेल्या लोकांसाठी स्लॅब बदलून करदात्यांना दिलासा देऊ शकतात. आयकर कायद्यानुसार, देशभरात आयकरासाठी स्लॅब प्रणाली काम करते. वैयक्तिक करदात्यांच्या तीन श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. एक म्हणजे ६० वर्षांखालील लोक, दुसरे ६० ते ८० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आणि तिसरे ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अति ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply