Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. IPO ने केलीय कमाल..! फक्त आठ महिन्यात 75 कंपन्या मालामाल; पहा, किती कोटी कमावले ?..

मुंबई : देशातील आयपीओ मार्केटला सध्या अच्छे दिन आहेत. एकामागून एक, अनेक कंपन्या त्यांचे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर म्हणजेच IPO आणत आहेत. प्राथमिक बाजारात एप्रिल-नोव्हेंबर 2021 दरम्यान, 75 कंपन्यांनी IPO द्वारे तब्बल 89,066 कोटी रुपये उभे केले आहेत. सोमवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या 2021-22 च्या आर्थिक सर्वेक्षणात ही माहिती मिळाली आहे.

Advertisement

आर्थिक सर्वेक्षणानुसार, हा आकडा गेल्या दशकात IPO मधून कोणत्याही वर्षात उभारलेल्या एकूण रकमेपेक्षा खूप जास्त आहे. याआधी, एप्रिल-नोव्हेंबर 2020 दरम्यान, 29 कंपन्यांनी IPO द्वारे 14,733 कोटी रुपये उभे केले होते. आर्थिक सर्वेक्षणानुसार, 75 कंपन्यांनी एप्रिल-नोव्हेंबर 2021 दरम्यान IPO द्वारे 89,066 कोटी रुपये उभे केले. त्याच वेळी, 29 कंपन्यांनी एप्रिल-नोव्हेंबर 2020 दरम्यान IPO मधून 14,733 कोटी रुपये उभारले होते. अशा प्रकारे, 504.5 टक्के मोठी वाढ झाली आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, सोमवारी (31 जानेवारी) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्र्यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. सर्वेक्षणात 2022-23 मध्ये 8 टक्के ते 8.5 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आर्थिक सर्वेक्षण हे आर्थिक दस्तऐवज आहे. हे वित्त मंत्रालयाने जारी केलेले वार्षिक दस्तऐवज आहे, ज्यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित अधिकृत आणि नवीनतम डेटा समाविष्ट केला आहे. हे मुख्य आर्थिक मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली तयार केले जाते.

Loading...
Advertisement

दरम्यान, कोरोनाच्या संकटातही शेअर बाजाराची घोडदौड सुरुच होती. आता तर आयपीओचे दिवस आहेत. देशातील अनेक कंपन्यांनी आयपीओ आणले. पाहता पाहता कोट्यावधींचे भांडवल गोळा केले. गुंतवणूकदार सुद्धा मालामाल झाले. आता खासगी कंपन्यांप्रमाणेच सरकार कंपन्यासुद्धा आयपीओ आणत आहेत. त्यामुळे गुंतवणुकीच्या आधिक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Advertisement

मागील वर्षात 63 कंपन्यांनी त्यांच्या IPO द्वारे तब्बल 1 लाख 18 हजार 704 कोटी रुपयांचे भांडवल गोळा केले आहे. प्राइम डेटाबेसच्या अहवालानुसार, आयपीओमधून वाढलेला आकडा मागील वर्षाच्या तुलनेत 4.5 पट अधिक आहे. 2020 मध्ये 15 कंपन्यांनी IPO द्वारे 26 हजार 613 कोटी रुपये उभे केले होते. त्याच वेळी, 2017 मध्ये IPO मधून उभारलेल्या 68 हजार 827 कोटी रुपयांच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत जवळपास दुप्पट रक्कम उभी केली गेली आहे.

Advertisement

बाब्बो.. लवकरच येणार तब्बल 2 हजार कोटींचा आयपीओ; ‘या’ दिग्गज कंपनीने सुरू केलीय तयारी

Advertisement
Advertisement

Leave a Reply