Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आज सोने-चांदीचे दर घटले की वाढले.. ? ; जाणून घ्या, काय आहेत सोन्या-चांदीचे नवीन दर

दिल्ली : मागील काही दिवसांपासून काही अपवाद वगळता सोन्या-चांदीच्या भावात वाढ होत आहे. जागतिक बाजारातील परिस्थिती आणि देशांतर्गत मागणीत झालेली वाढ या कारणांमुळे सोन्याचे दर वाढत आहेत. आजही आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. सोन्याचे दर किरकोळ वाढले आहेत तर दुसरीकडे चांदीचे दर मात्र कमी झाले आहेत. मागील आठवड्यात सुद्धा सोन्या चांदीचे दर कमी झाले होते.

Advertisement

आज सोमवारी 24 कॅरेट सोन्याच्या दरात 133 रुपयांनी वाढ झाली. चांदीचे दर मात्र 322 रुपयांनी कमी झाले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति तोळा 48048 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारी सोन्याचा दर 47915 इतका होता. त्यामध्ये आज 322 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलोमागे 322 रुपयांची घसरण झाली असून, चांदीचे दर 61220 रुपयांवर स्थिरावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ उतार होत असल्याचे पहायला मिळत आहे. दर सतत कमी अधिक होत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण आहे.

Advertisement

IBJA ने दिलेल्या माहितीनुसार 22 कॅरट सोन्याच्या किमतीमध्ये देखील आज वाढ झाली आहे. या आठवड्यात सोमवारी सोने हे 133 रुपयांनी वाढले आहे. एकीकडे सोने वाढले आहे, तर दुसरीकडे चांदी मात्र स्वस्त झाली आहे. 2020 च्या ऑगस्ट महिन्यात सोन्याचे भाव सर्वाधिक होते. सोन्याची किंमत प्रति तोळा 56 हजारांवर पोहोचली होती. मात्र त्यानंतर सोन्याची किंमत सातत्याने कमी होत गेली. 2021 च्या ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 44 हजारांवर आले होते. मात्र आता पुन्हा एकदा यामध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे.

Loading...
Advertisement

सोन्याचे दर कमी जास्त होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे अनेक जण सोन्यातील गुंतवणूक कमी करुन अन्य पर्याय घेत आहेत. मागील वर्षातील डिसेंबरपर्यंत सोन्यातील गुंतवणूक बऱ्यापैकी कमी झाली होती. आता मात्र सोन्याची मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे भावही वाढले आहेत.

Advertisement

आज काय आहेत सोने-चांदीचे भाव; घटले की वाढले..? ; जाणून घ्या, मोठ्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव

Advertisement
Advertisement

Leave a Reply