Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

लवकरच येतोय आणखी एका चीनी कंपनाचा स्मार्टफोन; सॅमसंगला टक्कर देण्याचा आहे प्लान.. चेक करा, डिटेल..

मुंबई : देश-विदेशातील दिग्गज स्मार्टफोन कंपनी विवोचे स्मार्टफोनला देशात जबरदस्त मागणी आहे. या कंपनीचे मोबाइल देशात मोठ्या संख्येने विक्री होतात. Vivo फोनच्या अनेक मालिकेतील फोन्सना देशातील मार्केटमध्ये तुफान प्रतिसाद मिळाला आहे. आता कंपनीने टी सीरीजची घोषणा केली आहे. टी सीरीजचा पहिला फोन देशातील बाजारात ‘vivo T1’ 5G म्हणून सादर केला जाईल. ‘vivo T1’ 5G ची विक्री Flipkart वरून होणार आहे.

Advertisement

Vivo India च्या निवेदनानुसार, Vivo T1 5G हा 20 हजार रुपयांच्या श्रेणीतील सर्वात वेगवान आणि स्लिम 5G स्मार्टफोन असेल. Vivo T1 5G भारतात 9 फेब्रुवारीला लाँच होईल. असा दावा केला जात आहे, की Vivo T1 5G सह बहु-आयामी कामगिरी आणि ट्रेंडी डिझाइन उपलब्ध असेल. सध्या कंपनीने फोनच्या फीचर्सबद्दल माहिती दिलेली नाही. पण, पुढच्या काही दिवसांत vivo T1 5G च्या वैशिष्ट्यांची माहिती सोशल मीडिया हँडलद्वारे दिली जाईल असे निश्चितपणे सांगितले आहे. कंपनीच्या इतर फोन्सप्रमाणे, vivo T1 5G देखील मेक इन इंडिया असेल.

Advertisement

कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले, की विवो ब्रँड म्हणून आमचे लक्ष वापरकर्त्यांच्या गरजेवर आहे. युजर्सच्या गरजेनुसार, स्टाइलनुसार नवीन मालिकाही सुरू करण्यात येत आहे. फ्लिपकार्टसोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. गेल्या आठवड्यातच Vivo ने आपला नवीन 5G स्मार्टफोन Vivo Y75 5G देशात लाँच केला आहे. Vivo Y75 5G सह तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत.

Loading...
Advertisement

याशिवाय यामध्ये फ्लॅट डिझाइन देण्यात आले आहे. Vivo Y75 5G मध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. Vivo Y75 5G ची किंमत 21,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन याच प्रकारात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजमध्ये सादर करण्यात आला आहे.

Advertisement

ठरलं तर..! आता ‘या’ दिवशी सॅमसंग आणणार ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन; फिचरही आहे एकदम खास; जाणून घ्या, डिटेल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply