Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. ‘या’ वर्षात येणार दमदार इलेक्ट्रिक स्कूटर..! एकाच चार्जमध्ये 200 किलोमीटर रेंज; चेक करा, डिटेल..

मुंबई : देशात अनेक कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने दाखल झाली आहेत. सध्या वाहनांसाठी अनुकूल वातावरण पाहता आणखी काही इलेक्ट्रिक वाहने येणार आहेत. त्यामुळे कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. आताही अनेक कंपन्या इलेक्ट्रिक दुचाकी लाँच करण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्ही इलेक्ट्रिक मोटरसायकल घेण्याचा विचार करत असाल, तर येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. देशात लवकरच अनेक इलेक्ट्रिक मोटारसायकल लाँच होणार आहेत. काही दिवसात मार्केटमध्ये येणाऱ्या काही दुचाकींची माहिती आम्ही देत आहोत.

Advertisement

हिरो इलेक्ट्रिक AE-47
हिरो कंपनीची आगामी इलेक्ट्रिक स्कूटर Hero Electric AE-47 या वर्षी लाँच होण्यासाठी तयार आहे. ही स्कूटर हीरोची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर असेल. AE-47 eMotorcycle Lite मध्ये पोर्टेबल लिथियम आयन 48V/3|5 kWh बॅटरी आहे. त्याचबरोबर या स्कूटरला 4 हजार वॅट्सची पॉवर देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक मोटरसायकलचा कमाल वेग 85 kmph पेक्षा जास्त असू शकतो. या ई-स्कूटरमध्ये 2 मोड उपलब्ध आहेत. पॉवर मोडमध्ये, एका चार्जवर रेंज 85 किमी असल्याचा दावा केला जातो, तर इको मोडमध्ये, एका चार्जवर 160 किमीची रेंज मिळू शकते.

Advertisement

एमफ्लक्स वन
जर तुम्हाला इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये स्पोर्ट्स स्कूटर खरेदी करायची असेल, तर Mflux One ही इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते. हे 2018 ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आले होते. पण कोरोनामुळे स्कूटर लाँच केली नव्हती. ही इलेक्ट्रिक स्पोर्ट्स स्कूटर यावर्षी लाँच होण्याची शक्यता आहे. त्याचा टॉप स्पीड 200 किमी प्रतितास असू शकतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही स्कूटर एका चार्जवर 200 किमी चालवता येते.

Loading...
Advertisement

ओकिनावा ओके 100
Okinawa OK100 इलेक्ट्रिक मोटरसायकल या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लाँच होण्याची शक्यता आहे. स्कूटरमध्ये लिथियम-आयन बॅटरी आणि वेगवान चार्जरसह येते. ही स्कूटर पुढील महिन्यात लाँच केली जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

Advertisement

काम की बात : इलेक्ट्रिक स्कूटर घेताना ‘या’ 4 गोष्टी नक्की चेक करा; नुकसान होणार नाही

Advertisement
Advertisement

Leave a Reply