Take a fresh look at your lifestyle.

भारताचा मास्टरस्ट्रोक..! पाकिस्तान मार्गेच भारत अफगाणिस्तानला देणार मदत; पाकिस्तानचा ‘तो’ प्लानही फेल..

दिल्ली : अफगाणिस्तान मध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यापासून तेथे अनेक प्रकारची संकटे निर्माण झाली आहेत. एकीकडे देशात आर्थिक संकट आहे आणि अन्नधान्यही योग्य प्रमाणात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत भारताकडून या देशाला गहू पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताने तीन महिन्यांआधीच अफगाणिस्तानला 50 हजार मेट्रीक टन गहू आणि जीवनावश्यक औषधे देण्याची घोषणा केली होती.

Advertisement

मात्र, यामध्ये पाकिस्तानने अनेक अडचणी निर्माण केल्या, त्यामुळे ही मदत अफगाणिस्तानला देणे अजूनही शक्य झालेले नाही. आता मात्र, हे शक्य होईल अशा परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. गहू पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीपासून पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानमध्ये पोहोचेल, असे सांगण्यात आले.

Advertisement

अफगाणिस्तानला मदत देण्याबाबत दोन्ही देशात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर दोन्ही देशांमध्ये अटींच्या आधारे करार झाला आहे. भारताने याआधीच 50 हजार टन गहू आणि औषधे पाकिस्तानमार्गे रस्ते वाहतुकीने अफगाणिस्तानला पाठवण्याची घोषणा केली आहे. राजनैतिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिपमेंट फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुरू होईल. नियमांनुसार, पहिल्या खेपाच्या 30 दिवसांच्या आत एकूण प्रमाणात वाहतूक करणे आवश्यक आहे.

Advertisement

वास्तविक, पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने आपल्या ट्रकमधून अफगाणिस्तानला मदत द्यायची होती. या मुद्द्यावर आक्षेप घेत अन्नधान्य भारतीय किंवा अफगाण ट्रकमधून अफगाणिस्तानात पाठवावे, असे भारताकडून सांगण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानने सहमती दर्शवली की गव्हाची वाहतूक अफगाण ट्रकद्वारे केली जाईल आणि अफगाण कंत्राटदारांची यादी पाकिस्तानला दिली गेली.

Advertisement

भारताने गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला पाकिस्तानला प्रस्ताव पाठवला होता. पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानातील लोकांना 50 हजार टन गहू आणि जीवनरक्षक औषधे पाठवण्यासाठी ट्रान्झिट सुविधेची मागणी करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, अन्नधान्य, कोविड लस आणि जीवनरक्षक औषधे यासह अफगाण लोकांना मानवतावादी मदत देणार आहोत. गेल्या काही दिवसांत ३.६ टन वैद्यकीय मदत आणि 5 लाख कोविड लसींचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Advertisement

भारतामुळेच ‘त्या’ लोकांना मिळतेय अन्न; पैसे नसल्याने गहू देण्याचा निर्णय; पहा, कोणत्या देशाने घेतलाय ‘हा’ निर्णय

Advertisement

भारत देणार अफगाणिस्तानला 50 हजार मेट्रिक टन गहू.. याबाबत काय म्हणाले पाकिस्तानचे पंतप्रधान

Advertisement
Advertisement

Leave a Reply