Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. मार्केटमध्ये लवकरच येतोय ‘Redmi’ चा ‘हा’ दमदार स्मार्ट टीव्ही; फिचरही आहेत एकदम खास..

मुंबई : देशात स्मार्टफोन प्रमाणेच आता स्मार्ट टीव्हीलाही मागणी वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये आणत आहेत. आताही दिग्गज स्मार्टफोन कंपनी रेडमी देशात लवकरच एक दमदार स्मार्ट टीव्ही लाँच करणार आहे. Redmi Smart TV X43 स्मार्ट टीव्ही कधी लाँच होणार हे आता ठरले आहे. Redmi Smart TV X43 देशात 9 फेब्रुवारी रोजी लाँच होणार आहे. या टीव्हीमध्ये 43 इंच की 4K रिझॉल्यूशन डिस्प्ले असेल. याच वेळी Redmi Note 11S आणि Redmi Smart Band Pro लाँच केले जाणार आहेत.

Advertisement

कंपनीच्या या सिरीजमधील X50, X5 आणि X65 टीव्ही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. Redmi Smart TV X43 या सीरीजमधील सर्वात लहान स्मार्ट टीव्ही आहे. Redmi Smart TV 43 हा सुद्धा मार्केटमध्ये आधीपासूनच आहे. मात्र, यामध्ये फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे आणि आता नवीन Redmi TV X43 मध्ये 4K HDR आणि डॉल्बी विजनचा सपोर्ट मिळणार आहे.

Advertisement

कंपनी Redmi TV X43 TV चा भविष्यातील रेडी फ्लॅगशिप कामगिरी म्हणून प्रचार करत आहे. याआधीचा Redmi X सीरिजचा स्मार्ट टीव्ही मीडियाटेकचा क्वाड-कोर प्रोसेसर, Mali G52 GPU आणि 2 GB RAM सह सादर करण्यात आला आहे. Redmi TV X43 30W स्पीकरसह डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करेल.

Loading...
Advertisement

Redmi Smart TV X43 मध्ये Android TV समर्थित असेल, ज्याबरोबरत कंपनीचे PatchWall सॉफ्टवेअर देखील असेल. टीव्हीबरोबर स्मार्ट बल्ब, Mi एअर प्युरिफायर यांसारख्या स्मार्ट उपकरणांवर नियंत्रण ठेवण्याचा पर्यायही असेल. टीव्हीची किंमत 40 हजार रुपयांपेक्षा कमी असेल.

Advertisement

.. तर ‘एसी’ आणि ‘टीव्ही’ च्या किंमती होतील झटक्यात कमी; फक्त सरकारने ‘तो’ निर्णय घेणे गरजेचे

Advertisement
Advertisement

Leave a Reply