Take a fresh look at your lifestyle.

खासगी नोकदारांसाठी दिलासादायक : पगाराबाबत सर्वेक्षणातून आलीय ही बाब समोर

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक फटका खासगी नोकदारांना बसला होता. आता एका सर्वेसक्षणातून खासगीनोकरदारांच्या पगाराबाबत एक दिलासादायक बाब समोर आली आहे.

Advertisement

महामारी असूनही पगारदार कर्मचार्‍यांचे पगार या वर्षी महामारीपूर्वीच्या पातळीपर्यंत वाढू शकतात. विशेष म्हणजे टॅलेंट टिकवण्यासाठी कंपन्या अनेक सुविधा देत आहेत. कॉर्न फेरी इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, २०२२ मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी ९.४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. 2021 मध्ये सरासरी वेतनवाढ 8.4 टक्के होती, तर 2019 मध्ये सरासरी 9.25 टक्के होती.

Advertisement

सर्वेक्षणानुसार देशातील बहुतांश व्यापाऱ्यांचे मत आहे की, यावर्षी कोरोना व्हायरसमुळे व्यवसायावर परिणाम होणार नाही. दरम्यान, 2020-21 च्या साथीच्या आजारानंतर चालू आर्थिक वर्षात कंपन्या चांगले निकाल जाहीर करत आहेत.

Advertisement

कर्मचार्‍यांच्या पगारात होणारी वाढ ही व्यवसायाची कामगिरी, उद्योगाचे मेट्रिक्स आणि बेंचमार्क ट्रेंडवर अवलंबून असेल, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, 40 टक्के कर्मचारी सक्रियपणे नवीन नोकऱ्या शोधत आहेत.

Advertisement

सर्वेक्षणानुसार, या वर्षी टेक कंपन्या सर्वात जास्त 10.5 टक्क्यांनी पगार वाढवू शकतात. यानंतर, जीवन विज्ञान 9.5 टक्के, सेवा, वाहन आणि रासायनिक कंपन्यांमध्ये 9 टक्के वाढ अपेक्षित आहे.

Advertisement

दरम्यान, सर्वेक्षण केलेल्या 786 कंपन्यांपैकी 60 टक्के कंपन्यांनी सांगितले की ते घरून काम केल्यामुळे कर्मचाऱ्यांना वाय-फाय कव्हरेज भत्ता देत आहेत. त्याच वेळी 10 टक्के कंपन्या प्रवास भत्ता कमी किंवा काढून टाकण्याच्या तयारीत आहेत.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply