Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी खरेदी केलीय ‘ही’ शानदार स्कूटर.. पहा, काय आहेत दमदार फिचर..?

मुंबई : दुचाकी कंपनी होंडाच्या Grazia 125 स्कूटरला मोठे यश मिळाले आहे. कंपनीने सांगितले, की या स्टायलिश दिसणाऱ्या स्कूटरने देशाच्या पूर्वेकडील राज्यात 2 लाख युनिट विक्रीचा टप्पा पार केला आहे. या स्कूटरमध्ये बाह्य इंधनाचे झाकण आणि साइड-स्टँड इंडिकेटरसह इंजिन-कट ऑफ यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्याची थेट स्पर्धा TVS NTorq 125, Suzuki Burgman Street आणि Aprilia SR 125 सारख्या स्कूटरबरोबर आहे.

Advertisement

कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, स्कूटरला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळेच देशाच्या पूर्वेकडील भागात हा मोठा आकडा पार केला आहे. या प्रदेशात बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम, ओडिशा, आसाम या राज्यांचा समावेश होतो. स्कूटर एकूण तीन प्रकारांमध्ये येते. त्याची किंमत 78,389 रुपये ते 87,668 रुपये आहे.

Advertisement

Honda Grazia BS6 चा लूक खूप आकर्षक आहे. यात एलईडी हेडलॅम्पसह, हँडलबार काउल एलईडी डीआरएल आणि ‘जेट-प्रेरित’ टेल लॅम्प मिळतात. स्कूटरला पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते, ज्यामध्ये टॅकोमीटर रीडींग डिस्टन्स-टू-एम्प्टी, रियल टाइम आणि सरासरी मायलेज दर्शवते. यात एक्सटर्नल फ्युएल फिलर आणि सायलेंट स्टार्ट सारखी वैशिष्ट्ये आहेत.

Loading...
Advertisement

Honda Grazia 125 ला कंपनीच्या Activa 125 प्रमाणेच 124cc सिंगल-सिलिंडर इंधन-इंजेक्टेड इंजिन मिळते. हे इंजिन 8.25PS आणि 10.30Nm जनरेट करते. Activa 125 मध्ये, ही मोटर Grazia 125 प्रमाणेच टॉर्क बनवते, परंतु पीक पॉवर थोडा जास्त आहे. ग्रेझिया 125 ला सायलेंट स्टार्ट आणि आयडल स्टॉप सिस्टमसाठी ACG स्टार्टर मोटर देखील मिळते.

Advertisement

.. आणि तरीही कार कंपन्यांनी केलाय ‘तो’ चमत्कार; पहा, डिसेंबर महिन्यात काय केलेय रेकॉर्ड ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply