Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. कोरोनाच्या संकटातही सोन्याने केलीय रेकॉर्ड ब्रेक कामगिरी.. एकाच वर्षात ‘इतकी’ वाढली मागणी; जाणून घ्या..

मुंबई : मागील वर्षात कोरोनाचे संकट असतानाही देशात सोन्याच्या मागणीत वाढ झाली. या वर्षभरात देशातील सोन्याचा वापर वाढून तब्बल 797.3 टन झाला आहे. या वर्षातही वाढीचा ट्रेंड कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) ने ‘गोल्ड डिमांड ट्रेंड 2021’ अहवालात म्हटले आहे, की 2021 मध्ये सोन्याची मागणी 78.6 टक्क्यांनी वाढून 797.3 टन झाली आहे जी 2020 मध्ये 446.4 टन होती.

Advertisement

WGC चे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सोमसुंदरम पीआर म्हणाले, की 2021 या वर्षाने सोन्याबद्दलच्या पारंपारिक विचारांच्या सामर्थ्याची पुन्हा चाचणी केली आहे. देशाची सोन्याची मागणी 79 टक्क्यांनी वाढून 797.3 टन झाली, मुख्यत: 343 टनांच्या अपवादात्मक चौथ्या तिमाहीतील मागणीचा परिणाम म्हणून या मागणीने तिसर्‍या तिमाहीत व्यक्त केलेल्या आमच्या अंदाजांनाही मागे टाकले आणि ती आतापर्यंतची सर्वोत्तम तिमाही ठरली आहे.

Advertisement

2022 साठी, सोमसुंदरम म्हणाले की, सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास आणि लक्षणीय व्यत्यय न आल्यास सोन्याची मागणी सुमारे 800-850 टन राहिल, असा अंदाज आहे. 2021 मध्ये सोन्याच्या दागिन्यांची मागणी मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाली आणि कोरोनाआधीचा टप्पा पार करुन सहा वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याचे ते म्हणाले. चौथ्या तिमाहीत 265 टनांची विक्रमी मागणी होती. मूल्याच्या बाबतीत, दागिन्यांची मागणी 96 टक्क्यांनी वाढून 2,61,140 कोटी रुपये झाली आहे. 2020 मध्ये ते 1,33,260 कोटी रुपये होते.

Loading...
Advertisement

2021 मध्ये एकूण गुंतवणुकीची मागणी 43 टक्क्यांनी वाढून 186.5 टन झाली. मूल्याच्या दृष्टीने मागणी 45 टक्क्यांनी वाढून 79,720 कोटी रुपये झाली. तथापि, देशातील एकूण सोन्याचा पुनर्वापर 21 टक्क्यांनी घसरून 75.2 टन झाला आहे. देशातील सोन्याची एकूण आयात 165 टक्क्यांनी वाढून 924.6 टन झाली आहे.

Advertisement

आज काय आहेत सोने-चांदीचे भाव; घटले की वाढले..? ; जाणून घ्या, मोठ्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव

Advertisement
Advertisement

Leave a Reply