Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण.. जाणून घ्या, दिल्ली-मुंबईत काय आहेत सोन्या-चांदीचे भाव..?

मुंबई : आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी राजधानी दिल्लीत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. आज दिल्ली सोने मार्केटमध्ये सोन्याचा भाव 423 रुपयांनी कमी झाला, तर चांदीचे भाव तब्बल 1105 रुपयांनी कमी झाले. आज दिल्लीत सोन्याचा भाव 47,777 रुपये प्रति दहा ग्रॅम, तर चांदीचा भाव 61,652 रुपये प्रति किलो राहिला. आज सलग तिसऱ्या सत्रात सोन्याच्या किमतीवर दबाव दिसून आला. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्य वृद्धीचाही किंमतीवर परिणाम झाला आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांच्या मजबूतीसह 75.04 वर बंद झाला.

Advertisement

HDFC सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, गुरुवारी सोन्याचा बंद भाव 48,200 रुपये आणि चांदीचा भाव 62,757 रुपये प्रति किलो होता. दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 4.35 डॉलरने घसरून 1788.75 डॉलर प्रति औंस झाला. चांदी 0.13 डॉलरने कमी होऊन 22.538 डॉलर प्रति औंस झाली. देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किमतीवर दबाव आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंमध्ये आज संध्याकाळी सोने 164 रुपयांच्या घसरणीसह 47,746 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​व्यवहार करत होते.

Advertisement

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, कोविड-19 आणि या वर्षी देखील मागणीत वाढ झाल्यामुळे 2021 मध्ये देशातील सोन्याचा वापर 797.3 टन झाला आहे. हा ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा आहे. 2021 मध्ये सोन्याची मागणी 78.6 टक्क्यांनी वाढून 797.3 टन झाली, जी 2020 मध्ये 446.4 टन होती.

Loading...
Advertisement

दरम्यान, आज देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही 24 कॅरेट सोन्याचे दर कमी झाल्याचे दिसून आले. गुडरिटर्न्स या वेबसाइटनुसार, सध्या मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर 49 हजार 640 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. चांदीचे दर 63 हजार 200 रुपये प्रति किलो असे आहेत.

Advertisement

आज काय आहेत सोने-चांदीचे भाव; घटले की वाढले..? ; जाणून घ्या, मोठ्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव

Advertisement
Advertisement

Leave a Reply