Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. लवकरच येणार तब्बल 2 हजार कोटींचा आयपीओ; ‘या’ दिग्गज कंपनीने सुरू केलीय तयारी

मुंबई : देशात सध्या आयपीओंना अच्छे दिन आहेत. आजच अदानी विल्मर कंपनीचा आयपीओ दाखल झाला आहे. त्यानंतर आणखी एका मोठ्या कंपनीचा आयपीओ लवकरच दाखल होणार आहे. BoAt ब्रँड अंतर्गत देशात इयरफोन आणि स्मार्टवॉच विक्री करणाऱ्या कंपनीच्या पॅरेन्ट असलेल्या इमॅजिन मार्केटिंगने SEBI कडे 2000 कोटी रुपयांच्या IPO साठी ड्राफ्ट पेपर दाखल केले आहेत. इमॅजिन मार्केटिंगच्या या IPO मध्ये तब्बल 11 अब्ज रुपयांचा ऑफर फॉर सेल असेल.

Advertisement

साउथ लेक इन्व्हेस्टमेंट्स (South Lake Investments) यामध्ये 8 अब्ज रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. Axis Capital, BoFA Securities, Credit Suisse Securities, ICICI Securities या आयपीओचे व्यवस्थापक आहेत. कंपनी IPO मधून मिळणारे पैसे कर्ज परत करण्यासाठी वापरणार आहे. ही स्टार्टअप कंपनी Headphones, Earphones, Wearables, Speakers Headphones, Earphones, Speakers आणि charger यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची विक्री करते. इअर वेअरेबल श्रेणीमध्ये त्याचा 45.5 टक्के बाजार हिस्सा आहे तर वेअरेबल वॉच श्रेणीत 26.9 टक्के हिस्सा आहे.

Advertisement

कंपनीचे स्वतःचे उत्पादन युनिट नाही. कंपनी चीनमधून उपकरणे खरेदी करते आणि येथे ब्रँडिंग करुन त्यांची विक्री केली जाते. आता मात्र कंपनी स्वतःचे उत्पादन प्रकल्प लवकरच सुरू करण्याच्या विचारात आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशात सध्या आयपीओंना अच्छे दिन आहेत. कोरोना काळातही कंपन्या आयपीओच्या माध्यमातून पाहता पाहता कोट्यावधींचा निधी गोळा करत आहेत. गुंतवणूकदारांना सुद्धा फायदा मिळत आहे. आता नव्या वर्षात सुद्धा शेअर बाजारात आयपीओंचा पाऊस पडणार आहे. एक दोन नाही तर तब्बल 45 कंपन्यांचे आयपीओ येणार असल्याची माहिती आहे. या कंपन्यांनी तयारीही सुरू केली आहे. यामध्ये एलआयसी या सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीचाही समावेश आहे. त्यामुळे नव्या वर्षात गुंतवणुकीसाठी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

Advertisement

‘अदानी विल्मर’ आयपीओबाबत महत्वाची बातमी; जाणून घ्या, काय आहे कंपनीचे नियोजन

Advertisement
Advertisement

Leave a Reply