Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Jio चे दमदार रिचार्ज प्लान..! दररोज 1.5 GB डेटा आणि बरेच काही; जाणून घ्या, डिटेल..

मुंबई : टेलिकॉम कंपन्या युजर्ससाठी अनेक उत्तम प्लॅन ऑफर करत आहेत. त्याच वेळी, रिचार्ज प्लानच्या किंमती वाढल्यानंतर युजर्स असे प्लान शोधत आहेत, जे कमी किंमतीत सर्वोत्तम फायदे देत आहेत. जर तुम्ही देखील अशा स्वस्त आणि सर्वोत्तम प्लानच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. येथे आम्ही तुम्हाला 150 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील रिचार्ज प्लानची माहिती घेतली. त्यानंतर आता जिओ कंपनीचे आणखीही कमी किंमतीत येणारे प्लान आहेत, त्याबाबत माहिती घेऊ या..

Advertisement

जिओच्या 149 रुपयांच्या प्लानमध्ये 20 दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये दररोज 1 जीबी इंटरनेट डेटा मिळतो. म्हणजेच, तुम्हाला एकूण 20 जीबी डेटा मिळतो. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादीत कॉल आणि 100 एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये जिओ अॅप सबस्क्रिप्शन मोफत आहे.

Advertisement

जिओचा 152 रुपयांचा एक रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 0.5 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच, या प्लानमध्ये एकूण 14 जीबी डेटा मिळतो. तसेच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादीत कॉल आणि 300 एसएमएस मोफत उपलब्ध आहेत. अतिरिक्त फायद्यांमध्ये जिओ अॅप सबस्क्रिप्शन मिळते.

Loading...
Advertisement

जिओच्या 179 रुपयांच्या प्लानमध्ये एकूण 24 दिवसांची वैधता आहे. या प्लानमध्ये दररोज 1 जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये एकूण 24 जीबी डेटा मिळतो. तसेच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादीत कॉल आणि 100 एसएमएस मिळतात. तसेच अतिरिक्त फायद्यांमध्ये जिओ अॅप मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

Advertisement

बाब्बो.. ‘जिओ’ चा धमाका..! देशातील तब्बल 1 हजार शहरांत देणार 5G नेटवर्क; पहा, काय आहे कंपनीचा प्लान..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply