Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनचा आणखी एक खतरनाक प्लान..! म्हणून ‘त्या’ 5 देशांना देतोय तब्बल 50 कोटी डॉलर; पहा, काय आहे ड्रॅगनचा प्लान

नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंगळवारी 5 मध्य आशियाई देशांमध्ये उपजीविका कार्यक्रम आयोजित करण्यासाठी तब्बल 50 कोटी डॉलर मदतीची घोषणा केली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंगळवारी चीनबरोबरच्या राजनैतिक संबंधांच्या 30 व्या वर्धापन दिनानिमित्त कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक परिषद घेतली.

Advertisement

या परिषदेत ते म्हणाले, की ‘मला जाहीर करायचे आहे की पुढील तीन वर्षांत मध्य आशियाई देशांमध्ये उपजीविका कार्यक्रम आयोजित करण्यासाठी चीन सरकार 50 कोटी अमेरिकन डॉलर्सची मदत देईल.’ सर्व 5 देशांच्या बॉर्डर चीनच्या बॉर्डरजवळ आहेत आणि आठ सदस्यीय शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) चे हे देश सदस्य आहेत, ज्याचा भारत देखील सदस्य आहे.

Loading...
Advertisement

या माध्यमातून चीन मध्य आशियाई देशांमध्ये आपला प्रभावात आणखी वाढ करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे तैवानला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने सोमवारी तैवानमध्ये 39 लढाऊ विमाने पाठवली आहेत. या वर्षी तैवानला पाठवण्यात आलेली ही सर्वात मोठी लढाऊ विमानांची तुकडी आहे. चीनची विमाने नेहमीच तैवानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी करत असतात. त्यामुळे या दोन्ही देशातील तणाव सातत्याने वाढत चालला आहे.

Advertisement

दरम्यान, जगातील गरीब आणि लहान देशांना अब्जावधींचे कर्ज देऊन त्यांना कर्जाच्या सापळ्यात अडकवणाऱ्या मुजोर चीनबाबत एक धक्कादायक बातमी आली आहे. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. चीनला सुद्धा कोरोनाने जबरदस्त फटका दिला असून चीनने मोठ्या प्रमाणात बाहेरुन कर्ज घेतले आहे. याबाबतीत अन्य आशियाई देशांच्या तुलनेत चीन आघाडीवर आहे. चीनची स्थिती पाहता देशावर एकूण १३००९.०३ अब्ज डॉलरचे बाह्य कर्ज आहे. त्याच वेळी, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनची लोकसंख्या 144 कोटींच्या आसपास आहे. यासह, चीनच्या प्रत्येक नागरिकावर 8971.71 डॉलरचे कर्ज आहे. असे असतानाही चीन मात्र लहान आणि गरीब देशांना कर्ज वाटत चालला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply