Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

500 GB पेक्षा जास्त डेटा आणि मोफत कॉल; ‘Jio’ चे ‘हे’ आहेत 11 महिने चालणारे दोन प्लान, जाणून घ्या, डिटेल..

मुंबई : रिलायन्स जिओकडे रिचार्ज प्लानची ​​मोठी यादी आहे. जिओकडे 14 दिवसांपासून 365 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत. Reliance Jio कडे देखील असे 2 प्लान आहेत, ज्यामध्ये युजर्सना 336 दिवसांची म्हणजेच 11 महिन्यांची वैधता मिळते. तुम्ही दीर्घ वैधता प्लान शोधत असाल, तर हा रिचार्ज तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या दोन रिचार्जपैकी एका रिचार्जमध्ये तुम्हाला 500GB पेक्षा जास्त डेटा मिळतो. त्याच वेळी, दुसरा प्लान किफायतशीर आहे आणि वापरकर्त्यांना त्यात मर्यादित डेटा दिला जातो. चला तर मग जाणून घेऊया जिओचे हे 2 प्लान कोणते आहेत आणि त्यामध्ये कोणते फायदे आहेत.

Advertisement

रिलायन्स जिओचा एक प्लान 2545 रुपयांचा आहे. जिओच्या या प्लानची ​​वैधता 336 दिवस म्हणजेच 11 महिने आहे. या प्लानमध्ये दररोज 1.5GB डेटा दिला जातो. म्हणजेच प्लानमध्ये यूजर्सना एकूण 504GB डेटा मिळतो. या प्लानमध्ये एका महिन्याची किंमत जवळपास 231 रुपये आहे. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्ही कोणत्याही नंबरवर मोफत कॉल करू शकता. प्लानमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, Jio अॅप सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते.

Loading...
Advertisement

रिलायन्स जिओचा 1559 रुपयांचा किफायतशीर प्लान आहे. जिओच्या या व्हॅल्यू प्लानमध्ये 336 दिवसांची म्हणजेच 11 महिन्यांची वैधता उपलब्ध आहे. या प्लानमध्ये एका महिन्याची किंमत सुमारे 142 रुपये आहे. प्लानमध्ये यूजर्सना एकूण 24GB डेटा मिळतो. प्लानमध्ये इतर कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल उपलब्ध आहे. प्लानमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, Jio अॅप सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे.

Advertisement

बाब्बो.. ‘जिओ’ चा धमाका..! देशातील तब्बल 1 हजार शहरांत देणार 5G नेटवर्क; पहा, काय आहे कंपनीचा प्लान..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply