Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टाटा-रिलायन्सला अदानी देणार जोरदार टक्कर; नव्या बिजनेस जगतात करणार पदार्पण..

मुंबई : बंदरापासून ऊर्जा क्षेत्रापर्यंत विस्तार असलेला अदानी उद्योग समूह आता इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात दाखल होण्याची शक्यता आहे. यासाठी अदानी या नावाने ट्रेडमार्क नोंदणीकृत करण्यात आला आहे. देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांची कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी अदानी ट्रेडमार्कचा वापर करणार आहे. समूह प्रथम इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांवर लक्ष केंद्रित करेल. यामध्ये कोच, बस आणि ट्रकचा समावेश असेल. अदानी ग्रुप या क्षेत्रात दाखल झाल्यास टाटा आणि रिलायन्य कंपन्यांना जोरदार टक्कर मिळणार आहे.

Advertisement

खरे तर, अदानी समूह बंदरे आणि विमानतळांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतलेला आहे, ज्यांना व्यावसायिक वाहनांची आवश्यकता आहे. या उद्देशासाठी, कंपनी प्रथम आपले उत्पादन वापरेल. याबरोबरच ते बॅटरीचे उत्पादन करणार असून देशभरात चार्जिंग स्टेशनही उभारणार आहे.

Advertisement

अदानी समूह ग्रीन प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत आहे. समूहाने अलीकडेच ग्रीन हायड्रोजन उत्पादनांसाठी नवीन उपकंपनी स्थापन केली आहे. यामध्ये कमी कार्बन वीज आणि पवन टर्बाइनची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये सोलर मॉड्युल आणि बॅटरी देखील बनवल्या जाणार आहेत. ती जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा कंपन्यांपैकी एक असेल.

Loading...
Advertisement

अदानी समूहाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नवीन ऊर्जा व्यवसायात 70 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले होते. ही रक्कम पुढील दहा वर्षांत खर्च करण्यात येणार आहे. समूहाकडे मजबूत पायाभूत सुविधा आहे आणि गुजरातमधील मुंद्रा येथे विशेष आर्थिक क्षेत्रात संशोधन आणि विकास केंद्र स्थापन करण्याची त्यांची योजना आहे. याद्वारे इलेक्ट्रिक मोबिलिटीवर भर दिला जाणार आहे. अदानी या क्षेत्रात थेट टाटा आणि रिलायन्सशी स्पर्धा करेल. या दोन्ही कंपन्यांनी या क्षेत्रात उतरण्याची तयारी केली आहे.

Advertisement

अदानींनी दिलाय भल्याभल्यांना झटका..! पहा नेमका काय कारनामा केलाय बिजनेस जगतामध्ये

Advertisement

अदानी-अंबानी सुसाट..! पहा नेमकी किती संपत्ती आहे दोघांच्याही खिशात..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply