Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पहिल्याच दिवशी सोन्याची किंमत वाढली; सोने खरेदीआधी चेक करा सोन्या-चांदीचे नवीन भाव

मुंबई : जर तुम्ही आज दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्या-चांदीची नवीन किंमत जाणून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमतीत वाढ झाली, तर दुसरीकडे चांदीच्या दरात घट झाली. सोन्याच्या भावात आज 0.36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीसह 24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव 48,424 रुपये झाला आहे. दुसरीकडे, चांदीचे दर आज 0.06 टक्क्यांनी कमी झाले. त्यामुळे आता चांदीचा भाव 64,770 रुपये प्रति किलोवर पोहोचला.

Advertisement

गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 47 हजार 520 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 520 रुपये प्रति दहा ग्रॅम असा झाला आहे.

Advertisement

आपल्या देशात सोने हा उत्तम गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. यामुळेच भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. गेल्या काही दिवसांपासून एखादा अपवाद वगळता सोन्याच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याची किंमत 48 हजार रुपयांच्या पुढे आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे आणि पुढील 12 महिन्यांत सोन्याचे दर सर्वकालिक सर्वाधिक दराचा टप्पा पार करतील.

Loading...
Advertisement

ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते. भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. सध्या देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेच्या काळात सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे. याबरोबरच गुंतवणूकदार पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. यामुळेच सोन्याच्या आयातीबरोबरच भौतिक सोने आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे. तज्ज्ञही सोन्यात गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ सांगत आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या 12 ते 15 महिन्यांत सोन्याचा भाव 56,000 रुपयांचा सार्वकालिक टप्पा पार करेल.

Advertisement

.. तर फक्त एकाच वर्षात सोन्याच्या किंमतीत घडेल ‘हा’ चमत्कार; पहा, काय अंदाज व्यक्त केलाय तज्ज्ञांनी

Advertisement
Advertisement

Leave a Reply