Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नव्या वर्षात खुशखबर..! घटत चाललेला परकीय चलन साठा वाढला; फक्त सात दिवसात ‘इतक्या’ डॉलरची पडली भर

मुंबई : देशाच्या परकीय चलन साठा सातत्याने कमी होत होता. आता मात्र, नव्या वर्षातील पहिल्या महिन्यात खुशखबर मिळाली आहे. 14 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा 2.229 अब्ज डॉलरने वाढून 634.965 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 7 जानेवारी रोजी संपलेल्या मागील आठवड्यात परकीय चलन साठा 87.8 कोटी डॉलरने कमी होऊन 632.736 अब्ज डॉलर झाला होता. तर 3 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात चलन साठा 642.453 असा सर्वाधिक होता.

Advertisement

RBI च्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 14 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात वाढ होण्याचे कारण म्हणजे परकीय चलन मालमत्ता (FCA) आणि सोन्याच्या साठ्यात झालेली वाढ. जे एकूण साठ्याचे एक महत्त्वपूर्ण घटक मानले जातात. RBI डेटानुसार, परकीकय चलन मालमत्ता साठा या आठवड्यात 1.345 अब्ज डॉलरने वाढून 570.737 अब्ज डॉलर झाला आहे. डॉलरमध्ये व्यक्त केलेल्या परकीय चलनाच्या मालमत्तेमध्ये यूरो, पौंड आणि येन यांसारख्या गैर अमेरिकन चलनांचाही समावेश होतो.

Advertisement

या कालावधीत सोन्याच्या साठ्याचे मूल्य 27.6 कोटी डॉलरने वाढून 39.77 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सह विशेष रेखांकन अधिकार पुनरावलोकनाधीन आठवड्यात 12.3 कोटी डॉलरने वाढून 19.22 अब्ज डॉलर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील देशाचा चलन साठाही 3.6 कोटी डॉलरने वाढून 5.238 अब्ज डॉलर झाला आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, जेव्हा आपण परदेशाकडून कोणतीही वस्तू खरेदी करतो तेव्हा त्याचे व्यवहार डॉलरमध्ये होतात. अशा परिस्थितीत आयातीला मदत करण्यासाठी परकीय चलनाचा साठा असणे आवश्यक आहे. परदेशातून येणारी गुंतवणूक अचानक कमी झाली, तर त्या वेळी त्याचे महत्त्व आणखी वाढते. जर परकीय चलनाच्या साठ्यात वाढ होत असेल तर याचा अर्थ देशात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक येत आहे. परकीय गुंतवणूक ही अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाची आहे.

Advertisement

.. तर फक्त एकाच वर्षात सोन्याच्या किंमतीत घडेल ‘हा’ चमत्कार; पहा, काय अंदाज व्यक्त केलाय तज्ज्ञांनी

Advertisement
Advertisement

Leave a Reply