Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

प्रत्यके पाकीस्तानीवर आहे ‘इतके’ लाख कर्ज..! पहा इम्रान खान यांनी नेमके काय केलेय

Please wait..

दिल्ली : पाकिस्तानची आर्थिकदृष्ट्या फारशी स्थिती कधीच चांगली नव्हती. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानला केवळ कंगालच बनवले नाही, तर अब्जावधी डॉलर्सच्या कर्जात बुडवले आहे. पाकिस्तान आता चीनसारख्या देशांचा आर्थिक गुलाम झाला आहे. पाकिस्तानवरील देशांतर्गत आणि विदेशी कर्ज 50 हजार अब्ज रुपयांच्यावर गेले आहे. यावर अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत हुसैन हक्कानी यांनी एका ट्विटमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशची तुलना केली. हक्कानी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘पाकिस्तानने IMF (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) कडून 1958 पासून 22 वेळा कर्ज घेतले आहे, ज्यामध्ये 1988 पासून 13 वेळा आणि 2000 पासून पाच वेळा कर्ज घेतले आहे. बांगलादेशशी याची तुलना केल्यास, 1974 नंतर केवळ 10 वेळा IMF कडून कर्ज घेणे आवश्यक होते, ज्यामध्ये 2000 नंतर केवळ दोनदा घेतलेल्या कर्जाचा समावेश होतो.

Advertisement
Loading...

इम्रान खान सत्तेवर आल्यानंतर संघर्षग्रस्त पाकिस्तानचे वाईट दिवस सुरू झाले. जागतिक बँकेच्या 2021 च्या कर्ज अहवालात पाकिस्तानला भारत आणि बांगलादेशपेक्षा खूपच वाईट रेट करण्यात आले आहे. कर्जाच्या बाबतीत पाकिस्तान आता श्रीलंकेच्या बरोबरीने जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. चीनच्या कर्जामुळे आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखी ताणली जात आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पाकिस्तानवरील एकूण बाह्य कर्ज 14 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पुढे जाईल. यापैकी निम्मे कर्ज हे चीनमधील व्यावसायिक बँकांचे आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) शी संबंधित प्रकल्पांसाठी पाकिस्तानने प्रामुख्याने या बँकांकडून कर्ज घेतले आहे. विदेशी कर्ज न घेण्याचे आश्वासन देऊन आलेले इम्रान खान सरकार कर्ज फेडण्यासाठी सातत्याने कर्ज घेत आहे. अलीकडेच पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान सरकारने कबूल केले होते की आता प्रत्येक पाकिस्तानी 1 लाख 75 हजार रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये इम्रान खान सरकारचे योगदान 54 हजार 901 रुपये आहे, जे कर्जाच्या एकूण रकमेच्या 46 टक्के आहे. गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानींवरचा हा कर्जाचा बोजा वाढला आहे. म्हणजेच इम्रान यांनी पाकिस्तानची सत्ता हाती घेतली तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकावर 1,20099 रुपयांचे कर्ज होते.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply