Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जुनी कार विकताय..? मग, ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच; मिळतील चांगले पैसे..!

मुंबई : जर तुमच्याकडे कार असेल आणि ती विकून नवीन कार घ्यायची असेल, तर तुम्ही जुनी कार विकताना अनेक महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून जुन्या कारचेही तुम्हाला चांगले पैसे मिळतील. काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याकडे लक्ष दिले तर तुमच्यासाठी ते निश्चित फायद्याचे राहिल तुमच्या कारची किंमत वाढेल. कार घेणाऱ्यालाही चांगल्या स्थितीतील कार मिळाल्याचा फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊ या काही महत्वाच्या गोष्टी, ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Advertisement

तुमची कार विकण्यापूर्वी कारवर कोणतेही स्क्रॅच मार्क नाहीत याची खात्री करा, जर असेल तर ती दुरुस्त करून घ्या, अन्यथा, वापरलेल्या कारसाठी चांगली रक्कम मिळणे कठीण आहे. कार विकताना व्यवस्थित स्वच्छ करा. जेणेकरून खरेदीदार चांगल्या स्थितीतील कार पाहून प्रभावित होईल. जेव्हा जेव्हा कार खरेदीदार तुमची कार पाहण्यासाठी येईल तेव्हा त्याची पहिली नजर कारवर पडेल आणि जर त्यात काही दोष असेल तर तो हा करार रद्द करू शकतो, अशा परिस्थितीत तुम्ही कार नेहमी चांगल्या स्थितीत राहिल, याची काळजी घेतली पाहिजे.

Advertisement

सर्व्हिसिंग पूर्ण झाल्यानंतरच वाहन खरेदीदाराला दाखवा, जेणेकरून चाचणी ड्राइव्ह दरम्यान तुमचे वाहन सुरळीत चालेल आणि खरेदीदार प्रभावित होईल. तुमच्या कारसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे पूर्ण असली पाहिजेत जेणेकरून खरेदीदाराला समजेल की तुमची कार पूर्णपणे खरेदी करण्यायोग्य आहे आणि कोणतीही कायदेशीर समस्या नाही किंवा इतर काही अडचणी नाहीत.

Loading...
Advertisement

कारमध्ये काही दोष असेल कोणीही खरेदीदार कार खरेदी करणार नाही. याप्रमाणे कार विकण्यापूर्वी ती नीट दुरुस्त करून घ्या आणि कारमध्ये कोणतीही समस्या तर नाही ना, याची खात्री करुन घ्या.

Advertisement

कारवाल्यांसाठी महत्वाची बातमी..! आता कार होणार आधिक सुरक्षित; केंद्र सरकार ‘तो’ निर्णय घेण्याच्या विचारात

Advertisement
Advertisement

Leave a Reply