Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Jio च्या ‘या’ जबरदस्त प्लानची क्रेझ..! अन्य कंपन्यांचे प्लान ठरतील फेल; पहा, काय मिळतात दमदार फायदे..?

मुंबई : देशातील दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने गेल्या वर्षी त्यांच्या प्रीपेड योजनांच्या किमती वाढवल्या. याशिवाय या तिन्ही कंपन्यांनी अनेक रिचार्ज प्लान्समध्ये सुधारणा केली होती आणि त्याबरोबर अनेक नवीन प्रीपेड प्लान सादर केले होते. आज आम्‍ही तुम्‍हाला देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायंस जिओच्‍या एका प्‍लानबद्दल सांगणार आहोत, जो Airtel आणि Vodafone Idea च्‍या तुलनेत तितकीच किंमत पण अधिक फायदे देतो.

Advertisement

Jio, Airtel आणि Vodafone Idea च्या 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या 299 रुपयांच्या प्लानबद्दल माहिती देत आहोत. ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल, हाय स्पीड डेटा आणि इतर फायदे मिळत आहेत. एकाच किंमतीच्या या तीन प्लानच्या फायद्यांमध्ये काय फरक आहे आणि कोणता प्लॅन सर्वोत्तम आहे हे जाणून घेऊ या..

Advertisement

एअरटेल 299 प्लान
एअरटेलचा 299 रुपयांचा रिचार्ज पॅक एका महिन्यासाठी Amazon प्राइम मोबाइल सबस्क्रिप्शन, 1.5GB दैनिक डेटा, दररोज 100 SMS आणि 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलसह येतो. या पॅकमध्ये Fastag वर 100 रुपयांचा कॅशबॅक, तीन महिन्यांचे अपोलो सबस्क्रिप्शन तसेच मोफत HelloTunes ची ऑफर आहे.

Loading...
Advertisement

Vodafone Idea 299 प्लान
Vi च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा, दररोज 100 SMS सुविधा आणि कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलचा लाभ मिळेल. Vi Movies आणि TV सबस्क्रिप्शन तसेच तुम्हाला या प्लानमध्ये कंपनीचे Binge All Night आणि Weekend Data Rollover वैशिष्ट्य देखील मिळेल. याबरोबरच या प्लानमध्ये तुम्हाला दर महिन्याला 2GB बॅकअप डेटा देखील मिळेल.

Advertisement

Jio 299 प्लान
Jio चा हा प्रीपेड प्लान 299 रुपयांचा आहे आणि यामध्ये कंपनी वापरकर्त्याला 28 दिवसांसाठी दररोज 2GB इंटरनेट, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि दररोज 100 SMS देते. तुमचा दैनंदिन डेटा संपल्यास, तुमचा इंटरनेट स्पीड 64Kbps इतका कमी होईल. इतकेच नाही तर या प्लानमध्ये तुम्हाला Jio TV, Jio Cloud आणि Jio Cinema सारख्या सर्व Jio अॅप सबस्क्रिप्शन देखील मिळेल. सध्या हा प्लान घेतल्यास तुम्हाला Jiomart वर 20 टक्के कॅशबॅक देखील मिळेल.

Advertisement

5G कशाला, आता रिलायन्स जिओ करतेय 6G ची तयारी; इंटरनेट स्पीड असेल सुपरफास्ट..

Advertisement
Advertisement

Leave a Reply