Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आज काय आहेत सोन्या-चांदीचे भाव..? जाणून घ्या, राज्यातील मोठ्या शहरातील बाजारभाव..

मुंबई : सोने चांदी मार्केटमध्ये मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. या वर्षात सोन्याला मागणी आणखी वाढणार असून सोने 55 हजारांच्याही पुढे जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता चांदीच्या बाबतीतही असाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2022 आणि पुढील काही वर्षे चांदीच्या मागणीत मोठी तेजी दिसून येईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. सध्या या दोन्ही धातूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत की कमी झाले आहेत, हे जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

आज शुक्रवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या फेब्रुवारी वायदे दरात 0.02 टक्के वाढ झाली. त्यामुळे आता सोने 48 हजार 327 रुपये प्रति दहा ग्रॅम असे दर आहेत. चांदीचे भाव मात्र कमी झाले आहेत. आज चांदीचे भाव 0.38 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे आज एक किलो चांदीचा भाव 65 हजार 130 रुपये असा आहे.

Advertisement

आज राजधानी मुंबई शहरात 24 कॅरेट सोन्यासाठी 49 हजार 600 रुपये तर 22 कॅरेटसाठी 47 हजार 600 रुपये असा भाव आहे. पुणे शहरात 24 कॅरेटसाठी 49 हजार 380 रुपये, 22 कॅरेटसाठी 46 हजार 840 रुपये, नाशिक शहरात 24 कॅरेटसाठी 49 हजार 380 रुपये तर 22 कॅरेटसाठी 46 हजार 840 रुपये आणि नागपूर शहरात 24 कॅरेटसाठी 49 हजार 600 रुपये तर 22 कॅरेटसाठी 47 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम असा भाव आहे. या चारही शहरात एक किलो चांदीचा भाव 65 हजार 400 रुपये असा आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, दरम्यान, ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) ने 2022 च्या अर्थसंकल्पात वस्तू आणि सेवा कर (GST) दर 1.25 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची सरकारला विनंती केली आहे. 2022-23 च्या अर्थसंकल्पाआधीच्या शिफारशींमध्ये, GJC ने सोने, मौल्यवान धातू, रत्ने आणि अशा वस्तूंपासून बनवलेल्या दागिन्यांवर 1.25 टक्के GST ची मागणी केली आहे. सध्या रत्ने आणि दागिन्यांवर जीएसटीचा दर 3 टक्के आहे.

Advertisement

आज सोन्या-चांदीचे भाव वाढले की घटले..? ; सोने खरेदीआधी चेक करा काय आहेत नवीन दर

Advertisement
Advertisement

Leave a Reply