Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

5G कशाला, आता रिलायन्स जिओ करतेय 6G ची तयारी; इंटरनेट स्पीड असेल सुपरफास्ट..

मुंबई : देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांना जोरदार झटका. होय, कंपनीने आता 5G नाही तर थेट 6G तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे. देशात सध्या मोबाइल कंपन्या 4G सेवा देत आहेत. लवकरच 5G सेवा सुरू होणार आहे. सरकारी कंपनी बीएसएनएल तर अजून 3G वरच आहे. अशा परिस्थितीत जिओचा हा मास्टरस्ट्रोक ठरला आहे.

Advertisement

जिओची उपकंपनी Estonia ने 6G तंत्रज्ञानावर संशोधनास सुरुवात केली आहे. या प्रकल्पावर जिओ University ob Oulu बरोबर काम करत आहे. 6G टेक्नॉलॉजीच्या फ्यूचर वायरलेस end to end सोल्यूशनवर काम करत आहे. जिओ 6G चा परिणाम मॅन्यूफॅक्चरिंग, डिफेन्स आणि इंडस्ट्रीयल मशीनरीवर होणार आहे. 6G तंत्रज्ञान 5G पेक्षा चांगले असेल. हे नेटवर्क 5G बरोबरच मिळेल, मात्र मोठ्या कंपन्या आणि ग्राहकांना मिळेल. 6G च्या स्पीडबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. मात्र, 5G पेक्षा 6G चा स्पीड 100 पट जास्त असेल असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

तंत्रज्ञानाच्या बाबतीत जिओ कंपनी नेहमीच आघाडीवर असते. आताही अन्य कंपन्या जेव्हा 5G साठी चाचपणी करत आहेत. त्यावेळी जिओ 5G बरोबरच सुपरफास्ट 6G नेटवर्क देण्याच्या दिशेने काम करत आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, कंपनीने असे खास फिचर आणले आहे ज्याच्या मदतीने वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास बंद होणार आहे. रिचार्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी रिलायन्स जिओ आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने टेलिकॉम उद्योगासाठी UPI ऑटोपे घोषणा केली आहे. आता करोडो जिओ वापरकर्ते कोणत्याही त्रासाशिवाय स्वयंचलित रिचार्जसाठी UPI ऑटोपे सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

Advertisement

या सुविधेद्वारे, जिओ युजर्स MyJio अॅपवर UPI ऑटोपे वापरून त्यांच्या पसंतीच्या टॅरिफ प्लॅनसाठी ऑर्डर सेट करू शकतात आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा मोबाईल रिचार्ज करण्याचे टेन्शन राहणार नाही. या घोषणेसह, रिलायन्स जिओ ही आपल्या ग्राहकांसाठी अशी सेवा सुरू करणारी भारतातील पहिली दूरसंचार कंपनी ठरली आहे. जिओ युजर्सना त्यांच्या सध्याच्या प्लॅनची ​​मुदत संपत असल्याची आणि रिचार्जची काळजी करण्याची गरज नाही. UPI ऑटोपे मदतीने युजर्स रिचार्ज स्वयंचलित करू शकतात. या पद्धतीत आधीच्या प्लानची मुदत संपताच त्यांच्या मोबाइल नंबरद्वारे आधीच सिलेक्ट केलेल्या प्लानचे आपोआप रिचार्ज केले जाईल.

Advertisement

वाव.. ‘त्यामध्ये’ ‘जिओ’ आणि ‘एअरटेल’ राहिले फायद्यात; ‘व्होडाफोन-आयडीया’ आणि ‘बीएसएनएल’ मात्र कोमात; जाणून घ्या, डिटेल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply