चहा आणि समोसा 6 रुपये तर एक प्लेट नाश्ता 37 रुपये; जाणून घ्या, कुणी ठरवलेत ‘हे’ दर
दिल्ली : देशातील 5 राज्यांतील निवडणुकीची सर्व उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जारी केलेल्या दर यादीत प्रत्येक वस्तूची किंमत निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना या किमतीत वस्तू खरेदी कराव्या लागतील. निवडणुकी दरम्यान उमेदवारांकडून नाश्ता आणि भोजन दिले जाते, त्याचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. उमेदवार एक प्लेट नाश्त्यासाठी प्रति प्लेट 37 रुपये आणि समोसा आणि एक कप चहासाठी 6-6 रुपये खर्च करू शकतो.
एक उमेदवार 16 रुपये प्रति मीटर दराने फुलांचे हार खरेदी करू शकतात आणि प्रचारासाठी 1,575 रुपये प्रति दिवस तीन ड्रमर भाडोत्री घेऊ शकतात. मात्र, पाण्याच्या बाटल्या एमआरपी दराने खरेदी करता येतील. निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वापरलेली वाहनेही निवडणूक खर्चात येतात. हा खर्च काढण्यासाठी प्रति किमी वाहनांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यांना अंतर, इंधन, टोल आणि इतर खर्चाचा तपशील सादर करावा लागेल.
या संदर्भात, BMW आणि मर्सिडीज सारख्या शानदार वाहनांचे दररोज 21 हजार रुपये भाडे तर SUV Mitsubishi Pajero Sport वाहने जास्तीत जास्त भाडे 12,600 रुपये प्रति दिवस या दराने भाडोत्री घेता येतील. याशिवाय, इनोव्हा, फॉर्च्युनर, क्वालिस या एसयूव्ही कार प्रति दिवस 2,310 रुपये या भाडोत्री घेता येतील. स्कॉर्पिओ आणि तवेरासाठी प्रतिदिन 1,890 रुपये आणि जीप, बोलेरो आणि सुमोसाठी 1,260 रुपये प्रतिदिन ठरवण्यात आले आहे. या रकमेत इंधन आणि खर्चाचा समावेश आहे.
याआधी, महिन्याच्या सुरुवातीला निवडणूक आयोगाने राज्य विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा 28 लाखांवरून 40 लाख रुपये केली होती. निवडणूक प्रचारात वापरल्या जाणाऱ्या लाऊड स्पीकरचा खर्च 1900 रुपये प्रति दिवस या दराने उमेदवाराच्या खर्चात जोडला जाईल. हॉटेलमध्ये राहण्यासाठी खोलीचे भाडे 1100 ते 1800 रुपये असेल. जनरेटरची किंमत प्रति दिवस 506 रुपये, बादली 4 रुपये प्रति नग, ट्यूब लाईट 60 रुपये, खाद्यपदार्थ 120 रुपये प्रति व्यक्ती, कोल्ड्रिंक 90 रुपये प्रति दोन लिटर याप्रमाणे जोडण्यात येणार आहे. याशिवाय उमेदवाराला डिजिटल खर्चाचा तपशील स्वतंत्रपणे द्यावा लागेल.
Election 2022 : ‘त्या’ प्रचारावर निवडणूक आयोगाची बंदी कायम; पहा, आता काय घेतलाय नवा निर्णय