दिल्ली : आज बुधवारी राष्ट्रीय राजधानीच्या सोने मार्केटमध्ये चांदीच्या किमतीत 1,603 रुपयांची वाढ झाली, तर स्थानिक मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत किरकोळ वाढ झाली. सोन्याच्या दरात 16 रुपयांनी वाढ झाली आहे. HDFC सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, रुपयाच्या कमजोरीमुळे सोन्याच्या किमतीत थोडी वाढ झाली आहे. आंतरबँक परकीय चलन बाजारात सुरुवातीच्या व्यापारा दरम्यान रुपया 12 पैशांनी घसरून 74.70 रुपये प्रति डॉलर झाला.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, की “रुपयाच्या घसरणीमुळे सोन्याच्या किमतीत किरकोळ वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,814.94 डॉलर प्रति औंसवर किरकोळ वाढले, तर चांदी 23.64 डॉलर प्रति औंसवर जवळपास अपरिवर्तित राहिली. दिल्ली सोने मार्केटमध्ये बुधवारी सोन्याचा भाव 16 रुपयांनी वाढून 47,878 रुपये प्रति 10 ग्रॅम पोहोचला. गेल्या सत्रात सोन्याचा भाव 47,862 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भाव 1,603 रुपयांनी वाढून 63,435 रुपये प्रति किलो झाला, जो मागील सत्रात 61,832 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
दरम्यान, ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) ने 2022 च्या अर्थसंकल्पात वस्तू आणि सेवा कर (GST) दर 1.25 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची सरकारला विनंती केली आहे. 2022-23 च्या अर्थसंकल्पाआधीच्या शिफारशींमध्ये, GJC ने सोने, मौल्यवान धातू, रत्ने आणि अशा वस्तूंपासून बनवलेल्या दागिन्यांवर 1.25 टक्के GST ची मागणी केली आहे. सध्या रत्ने आणि दागिन्यांवर जीएसटीचा दर 3 टक्के आहे.
सोने चांदी मार्केटमध्ये मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. या वर्षात सोन्याला मागणी आणखी वाढणार असून सोने 55 हजारांच्याही पुढे जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता चांदीच्या बाबतीतही असाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2022 आणि पुढील काही वर्षे चांदीच्या मागणीत मोठी तेजी दिसून येईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
अर्र.. म्हणून ‘हा’ देश विकतोय सोने..! पहा, कोणत्या मोठ्या संकटामुळे आलीय ‘ही’ वेळ..?