Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. म्हणून ‘हा’ देश विकतोय सोने..! पहा, कोणत्या मोठ्या संकटामुळे आलीय ‘ही’ वेळ..?

नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत महागाईचा भडका उडाला आहे. तर परकीय चलनाचा साठाही जवळपास रिकामा आहे. या वाईट परिस्थितीत, श्रीलंका सरकारने 1.2 अब्ज डॉलर आर्थिक मदत पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, श्रीलंकेवर हे संकट का आले आहे यासाठी चीन काही प्रमाणात जबाबदार असल्याचे मानले जात आहे. आता या देशाने या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि दिवाळखोरी होऊ नये, यासाठी सोन्याची विक्री सुरू केली आहे. असे करून हा देश आपल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याचा प्रयत्न करत आहे.

Advertisement

श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेच्या म्हणण्यानुसार, कमी होत चाललेला परकीय चलन साठा वाचवण्यासाठी त्यांनी सोन्याच्या साठ्यातील काही भाग विकला आहे. श्रीलंकेचे आघाडीचे अर्थतज्ज्ञ आणि सेंट्रल बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर डॉ. डब्ल्यू. ए विजेवर्धने यांनी मध्यवर्ती बँकेचा सोन्याचा साठा कमी झाल्याचे म्हटले आहे. डॉ.डब्ल्यू. विजेवर्धने यांनी ट्विटमध्ये लिहिले, की सेंट्रल बँकेचा सोन्याचा साठा 38.2 कोटीवरून 17.5 कोटींवर आला आहे. त्याच वेळी, श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर निवार्ड कॅब्राल यांनी देखील सांगितले, की देशाने तरल परदेशी मालमत्ता वाढ करण्यासाठी आपल्या सोन्याच्या साठ्यातील काही भाग विकला आहे.

Advertisement

श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेने चलन बदलल्यानंतर वर्षाच्या शेवटी सोन्याचा साठा वाढला. एका अहवालानुसार, असा अंदाज आहे की 2021 च्या सुरुवातीला श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेकडे 6.69 टन सोन्याचा साठा होता. यानंतर आता जवळपास 3.6 टन सोन्याची विक्री झाली आहे. त्यामुळे या देशाकडे आता केवळ 3 ते 3.1 टन सोने शिल्लक राहिले आहे. श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेने 2020 मध्येही सोने विकले होते. श्रीलंकेकडे यापूर्वी 19.6 टन सोन्याचा साठा होता, त्यापैकी 12.3 टन सोन्याची विक्री झाली होती. यापूर्वी या देशाने 2015, 2018 आणि 2019 मध्येही सोने विकले होते.

Advertisement

दरम्यान, श्रीलंकेच्या आर्थिक संकटाचे सर्वात मोठे कारण म्हणजे परकीय कर्ज. चीन, जपान या देशांचे मोठे कर्ज श्रीलंकेवर आहे. या वर्षासाठी एकूण शिल्लक 6.9 अब्ज डॉलर असेल. जुलैमध्ये 100 दशलक्ष डॉलर भरावे लागतील. श्रीलंकेवर चीनचे सर्वाधिक कर्ज आहे. या संधीचा फायदा घेत चीनने श्रीलंकते हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

परकीय चलनाचा साठा हा देखील श्रीलंकेसाठी मोठी समस्या आहे. नोव्हेंबर 2021 च्या अखेरीस श्रीलंकेचा परकीय चलनसाठा फक्त 1.58 अब्ज डॉलर होता. जो 2019 मध्ये राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पदभार स्वीकारला तेव्हा 7.5 अब्ज डॉलर होता. परकीय चलनाचा साठा वाढ करण्यासाठी सरकारनेही अनेक निर्णय घेतले. सरकारने केंद्रीय रिजर्व बँकेचीही मदत घेतली. बँकेने श्रीलंकेबरोबर अनेक वेळा परकीय चलनाची अदलाबदल केली. परकीय चलनाचा साठा हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या व्यापारासाठी मोठा आधार असतो.

Advertisement

बाब्बो.. आधी चीनच्या कर्जाच्या जाळ्यात फसला, आता चीनकडेच मागतोय मदत; पहा, कोणत्या देशावर आलीय ‘ही’ वेळ

Advertisement
Advertisement

Leave a Reply