Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. तर सोने होऊ शकते आणखी स्वस्त; पहा, केंद्र सरकारकडे कुणी काय केलीय मागणी..?

मुंबई : पुढील महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये सरकार सोन्यावरील आयात शुल्कात कपात करू शकते. त्यामुळे अर्थसंकल्पानंतर सोने स्वस्त होण्याची शक्यता आहे. खरेतर, सोन्यावरील आयात शुल्क 7.5 टक्क्यांवरून 4 टक्के करण्याची मागणी जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने (जीजेईपीसी) सरकारकडे केली आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत या उद्योगाला स्पर्धात्मक राहण्यास मदत होईल.

Advertisement

GJEPC ने आपल्या पूर्व-अर्थसंकल्पीय शिफारशींमध्ये कट आणि पॉलिश केलेले हिरे आणि रत्नांवर आयात शुल्क 7.5 टक्क्यांवरून 2.5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची सूचना केली आहे. तसेच उद्योगासाठी विशेष पॅकेज देण्याचे आवाहन केले. 500 कोटींऐवजी आयात शुल्क 4 टक्के कमी केल्याने केवळ 225 कोटी रुपयांचे खेळते भांडवल अडकेल, असे परिषदेने म्हटले आहे. उर्वरित रक्कम विस्तारासाठी वापरली जाऊ शकते.

Advertisement

भारत हा हिरे आणि दागिन्यांचा जगातील 5 वा सर्वात मोठा निर्यातदार आहे. जागतिक रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत त्याचा वाटा 5.8 टक्के आहे. GJEPC चे अध्यक्ष कोलिन शाह म्हणाले, की आम्ही चालू आर्थिक वर्षात या क्षेत्रातील 41 अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य साध्य करू. याशिवाय, स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात आम्ही 100 अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. या क्रमाने, आम्ही सरकारला आवाहन करतो की आगामी अर्थसंकल्पात या क्षेत्रासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे.

Loading...
Advertisement

ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी) ने सरकारला जीएसटीचा दर 3 टक्क्यांवरून 1.25 टक्क्यांवर आणण्याची विनंती केली आहे. याबरोबरच पॅन कार्डची मर्यादा दोन लाखांवरून पाच लाख रुपये करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. क्रेडिट कार्डद्वारे दागिन्यांच्या खरेदीवर बँक कमिशन (1-1.5 टक्के) माफ करण्याची मागणीही परिषदेने केली आहे.

Advertisement

‘त्या’ शहरात सोने 50 हजार पार..! सोने खरेदीआधी जाणून घ्या, काय आहेत नवीन भाव..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply