Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. कोरोना संकटातही ‘या’ वाहन कंपनीने केलेय खास रेकॉर्ड; पहा, काय केलीय कामगिरी..?

दिल्ली : देशातील आघाडीची दुचाकी वाहन कंपनी होंडाने आणखी एक रेकॉर्ड केले आहे. होंडा मोटारसायकल अँड स्कूटर कंपनीच्या होंडा शाइन या दुचाकी वाहनाने देशभरात तब्बल 1 कोटी ग्राहक जोडले आहेत. 125cc सेगमेंटमध्ये होंडा शाइन सध्या 50 टक्क्यांहून अधिक मार्केट शेअरसह प्रथम क्रमांकावर आहे. तसेच, Honda Shine ने आत्तापर्यंत वार्षिक आधारावर 29 टक्के वाढ नोंदवली आहे.

Advertisement

1 कोटी ग्राहकांचा टप्पा गाठणारा Honda Shine हा पहिला 125cc मोटरसायकल ब्रँड आहे. पहिली Honda Shine 2006 मध्ये लाँच झाली होती. होंडा शाइनच्या ड्रम व्हेरियंटची किंमत 74,943 रुपये आहे. त्याच वेळी, शाइनच्या डिस्क मॉडेलची किंमत 78,842 रुपये आहे. या दिल्ली शहरातील शो रुममधील किंमती आहेत.

Advertisement

या दुचाकीला कंपनीचे eSP तंत्रज्ञान (Enhanced Smart Power Technology) आणि पर्यावरणपूरक BS-VI इंजिन देण्यात आले आहे. दुचाकीत 5 स्पीड ट्रान्समिशन आहे. तसेच 5 स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेन्शन आहे, ज्यामुळे दुचाकीला कोणत्याही रस्त्याचा त्रास होत नाही. कंपनीचे म्हणणे आहे, की CB Shine BS IV च्या तुलनेत Shine चे मायलेज 14 टक्क्यांनी वाढले आहे. Honda Shine ची इंधन टाकीची क्षमता 10.5 लीटर आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, मागील वर्षभरात अॅल्यूमिनियम, तांबे आणि अन्य धातूंसारख्या कच्च्या मालाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कंपन्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे कंपन्यांनी ग्राहकांनाही त्रास देण्याचे ठरवले आहे. वाहनांच्याा किंमतीत वाढ केली आहे. होंडाच नाही तर अन्य बऱ्याच दुचाकी आणि चारचाकी वाहन कंपन्यांनी नव्या वर्षात दरवाढ करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार या कंपन्यांनी नवीन वर्षात दरवाढ केली आहे. त्यामुळे आता नागरिकांना आता इंधनाच्या दरवाढी बरोबरच वाहनांच्या दरवाढीचाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. देशातील आघाडीच्या वाहन कंपन्यांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे.

Advertisement

नव्या वर्षात जोरदार झटका.. ‘या’ कंपनीच्या मोटारसायकल ठरणार जास्त पैशांच्या; पहा, किती केलीय दरवाढ

Advertisement
Advertisement

Leave a Reply