Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ शहरात सोने 50 हजार पार..! सोने खरेदीआधी जाणून घ्या, काय आहेत नवीन भाव..?

मुंबई : नवीन वर्षात सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक बाजारातील घडामोडींचाही सोने मार्केटवर परिणाम होत आहे. तर दुसरीकडे सध्या सोन्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट वाढत असतानाही आगामी काळात सोने आणि चांदीचे भाव आणखी वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आजही राष्ट्रीय राजधानी दिल्ली शहरात 24 कॅरेट सोन्याने 5 हजारांचा टप्पा पार केला आहे. दिल्लीत आज सोने 51 हजार 430 रुपये प्रति दहा ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्यास 47 हजार 140 रुपये असा भाव आहे.

Advertisement

आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49090 रुपये तर 22 कॅरेट सोने प्रति तोळा 47 हजार 090 रुपयांवर पोहोचले. पुणे शहरात मात्र सोन्याच्या भावात घसरण नोंदविली गेली. नागपूरमध्ये 24 कॅरेट सोने 49 हजार 090 रुपयांवर पोहोचले. ओमिक्रॉनच्या वाढत्या सावटामुळे सोने 55 हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, सध्या सोने-चांदीच्या भाव कमी जास्त होत आहेत. तरी देखील सोन्याचे भाव वाढणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Advertisement

गुडरिटर्न्स या वेबसाइटनुसार, आज मुंबईत 24 कॅरेट सोने 49 हजार 90 रुपये तर 22 कॅरेटसाठी 47 हजार 90 रुपये असे भाव होते. पुणे शहरात 24 कॅरेटसाठी 48 हजार 840 रुपये तर 22 कॅरेटसाठी 46 हजार 320 रुपये, नागपूरमध्ये 24 कॅरेटसाठी 49 हजार 90 रुपये आणि 22 कॅरेटसाठी 47 हजार 90 रुपये आणि नाशिक शहरात 24 कॅरेटसाठी 48 हजार 840 रुपये तर 22 कॅरेटसाठी 46 हजार 320 रुपये प्रति दहा ग्रॅम असे दर आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, सोने चांदी मार्केटमध्ये मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. या वर्षात सोन्याला मागणी आणखी वाढणार असून सोने 55 हजारांच्याही पुढे जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता चांदीच्या बाबतीतही असाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2022 आणि पुढील काही वर्षे चांदीच्या मागणीत मोठी तेजी दिसून येईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले, की यावर्षात चांदी 80 हजार आणि पुढील वर्षात 1.5 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या चांदीचे दर पुन्हा 61 हजारांपर्यंत आले आहेत. त्यानुसार चांदी यावर्षी 33 टक्के आणि पुढील तीन वर्षात 250 टक्के परतावा देण्याची शक्यता आहे.

Advertisement

सोने खरेदीआधी चेक करा नवीन भाव; पहा, आज किती रुपयांनी वाढलेत सोन्या-चांदीचे भाव ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply