दिल्ली : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेमुळे इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच IPPB ला मोठे यश मिळाले आहे. खरे तर, IPPB ने तीन वर्षांत तब्बल 5 कोटी नवीन ग्राहक जोडले आहेत. या ग्राहकांची खाती पूर्णपणे डिजिटल पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रातील सध्याच्या अत्यंत तीव्र स्पर्धेच्या काळातही पोस्टाने केलेली ही दमदार कामगिरी म्हणजे पोस्ट खात्याचे मोठे यश म्हणावे लागेल.
पोस्ट पेमेंट बँकेनुसार, 41 टक्क्यांहून अधिक खातेदार हे 18 ते 35 वयोगटातील आहेत. IPPB ने देशातील 1.36 लाख पोस्ट ऑफिसमधून ही खाती उघडली आहेत. त्यापैकी 1.20 लाख ग्रामीण भागात आहेत. त्याच वेळी, सुमारे 1.47 लाख डोअरस्टेप बँकिंग सेवा पुरवठादारांची मदत घेण्यात आली आहे. IPPB च्या मते, त्यांनी NPCI, RBI आणि UIDAI च्या इंटरऑपरेबल पेमेंट्स आणि सेटलमेंट सिस्टमद्वारे 13 हून अधिक भाषांमध्ये डिजिटल बँकिंग कार्य केले आहे.
दरम्यान, सध्याच्या काळात तुम्ही जर पैशांची सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोस्टाच्या अनेक योजना आहेत. पोस्टाच्या योजनांमध्ये जोखीम नेहमीच कमी असते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, येथे पैसेही सुरक्षित असतात. तसेच आता पोस्टाच्या योजनांद्वारे चांगला परतावा देखील मिळतो. त्यामुळे पोस्टात पैसे गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले जात आहे.
त्यात आता पोस्टानेही बदलत्या काळात स्वतः मध्ये बदल केले आहेत. त्याचा परिणाम म्हणून पोस्टाने नवीन ग्राहक जोडण्यात चांगले यश मिळवले आहे. तसे पाहिले तर सध्याच्या काळात पोस्टावर लोकांचा विश्वास वाढला आहे. आधीही तो होताच. मात्र, सध्या ज्या काही घटना घडत आहेत त्यामुळे लोकांचा पोस्टावरील विश्वास वाढत चालला आहे. याचा फायदा पोस्टालाही मिळत आहे.
पोस्टाची ‘ही’ स्कीम आहे एकदम खास..! होईल ‘असा’ फायदा; जाणून घ्या, महत्वाची माहिती