Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता ‘सॅमसंग’ ही देणार झटका..! नवे फोन येण्याआधीच तयार केलाय डोकेदुखीचा प्लान; पहा, काय करणार कंपनी ?

मुंबई : जगातील दिग्गज स्मार्टफोन कंपनी सॅमसंग लवकरच ग्राहकांना झटका देणार आहे. कंपनी पुढील काही आठवड्यांत नवीन Galaxy S-सिरीजचे प्रीमियम स्मार्टफोन्स आणण्याच्या तयारीत आहे. Samsung चे नवीन प्रीमियम फोन 8 फेब्रुवारीला येऊ शकतात. मात्र, लाँच होण्याच्या आधीच, या Galaxy S22 मालिकेतील स्मार्टफोनचे तपशील मिळाले आहेत. आता KoreaTimes च्या ताज्या अहवालात म्हटले आहे, की कंपनी या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किमतीत वाढ करू शकते. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे, की सेमी कंडक्टरच्या पुरवठ्यात कमतरता असल्याने कंपनी स्मार्टफोनच्या किमती वाढवू शकते.

Advertisement

स्मार्टफोन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घटकांच्या किमती 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. काही अहवाल सांगतात की Samsung Galaxy S22 सिरीज 899 डॉलर या सुरुवातीच्या किंमतीसह येऊ शकते. ही नवीन मालिका Samsung Galaxy S21 पेक्षा सुमारे 100 डॉलर अधिक खर्चिक असू शकते.

Advertisement

मात्र, काही अहवालांनी वेगळा दावा केला आहे. या अहवालांमध्ये असे म्हटले आहे, की Apple आणि चीनी ब्रँड्समधील तीव्र स्पर्धेमुळे, कंपनी Galaxy S22 ची किंमत Galaxy S21 प्रमाणेच ठेवेल. सॅमसंग आपल्या नवीन फ्लॅगशिप सीरीज अंतर्गत Galaxy S22, Galaxy S22 Plus आणि Galaxy S22 Ultra लाँच करेल. सॅमसंगची ही नवीन मालिका Qualcomm Snapdragon 8 Gen 1 किंवा Exynoss 2200 प्रोसेसरसह येऊ शकते.

Loading...
Advertisement

Samsung Galaxy S22 स्मार्टफोनमध्ये 6.06 इंच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. त्याच वेळी, Samsung Galaxy S22 Plus स्मार्टफोनमध्ये 6.55 इंच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. याशिवाय, Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोन मोठ्या 6.81 इंच डिस्प्लेसह येऊ शकतो. Samsung Galaxy S22 मालिकेच्या अल्ट्रा मॉडेलमध्ये S-Pen Stylus साठी स्लॉट असू शकतो. स्मार्टफोन 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकतात.

Advertisement

.. म्हणून चीनी लोकांना नकोत चीनी कंपन्यांचे फोन; पहा, चीनमध्ये कोणता स्मार्टफोन ठरलाय नंबर वन ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply