Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. ‘त्या’ पैशांतून होणार आपलेच संरक्षण..! मोदी सरकार सुरू करणार ‘ही’ अनोखी योजना, जाणून घ्या, डिटेल..

दिल्ली : वाहतुकीचे नियम मोडले म्हणून संबंधित वाहनचालकांवर कारवाई केली जाते. आर्थिक रक्कमही वसूल केली जाते. ही रक्कम आता नागरिकांच्या कल्याणकारी योजनांसाठी खर्च करण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे. या अनोख्या योजनेत जनतेच्या पैशातून त्यांच्या संरक्षणासाठी काही प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. यामध्ये विशेष निधी तयार करण्यात येणार आहे. या पैशाचा उपयोग जिल्ह्यातील रस्त्यांची सुरक्षा, पंचायत आणि प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेसाठी केला जाईल. त्याचबरोबर पुढील टप्प्यात या निधीतून रस्ते अपघातातील जखमींवर मोफत उपचाराची सुविधा सुरू करता येईल.

Advertisement

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुवर्ण चतुर्भुज (5846 किमी) योजनेत मोफत उपचार सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये रस्ते अपघातातील जखमींना 30 हजार रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. ते म्हणाले की, ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे, ती राज्य महामार्ग आणि इतर रस्त्यावरील प्रवाशांसाठी सुरू केली जाऊ शकते.

Advertisement

वाहतूक विभाग आणि इतर यंत्रणांनी कायदा मोडणाऱ्यांकडून जमा केलेला पैसा खर्च करण्याची योजना आहे. पर्यटन आणि वाहतूक विषयक संसदीय स्थायी समितीनेही रस्ते वाहतूक मंत्रालयाला या दिशेने कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मंत्रालयाने समितीला दिले आहे.

Advertisement

अधिकाऱ्याने सांगितले की, योजनेअंतर्गत रक्कम रस्ता सुरक्षा निधीमध्ये जमा केली जाईल. या रकमेतून रस्त्यांवर ब्लॅक स्पॉट्स, डिव्हायडर, रस्त्यावरील खड्डे, क्रॅश बॅरिअर्स, फलक आदी लावण्यात येणार आहेत. याशिवाय गरज भासल्यास आवश्यक बांधकाम करण्यात येणार आहे.

Loading...
Advertisement

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवर (SH) देशातील इतर रस्त्यांपेक्षा जास्त अपघात होतात. या अपघातात अनेक लोकांचे मृत्यू होतात. कमी-अधिक प्रमाणात जखमींची टक्केवारीही इतर रस्त्यांच्या तुलनेत जास्त आहे. कारण देशाच्या एकूण रस्त्यांच्या नेटवर्कमध्ये NH 2.1 टक्के, SH 3.1 टक्के आणि इतर रस्ते 94.96 टक्के (सुमारे 60 लाख किमी) आहेत.

Advertisement

राज्यात अपघाताचे प्रमाण घटले, या जिल्ह्यात तर वर्षभरात एकही अपघात नाही..!

Advertisement

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांसाठी मोदी सरकारची विशेष योजना, असा होणार नागरिकांचा फायदा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply