Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. म्हणून ‘त्या’ 150 लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व केले रद्द; पहा, शेजारी देशात काय घडलाय प्रकार ?

दिल्ली : पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने सोमवारी माहिती मंत्री चौधरी यांच्यासह सुमारे 150 संघीय आणि प्रांतीय लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व तात्पुरते निलंबित केले आहे. या मंडळींनी त्यांच्याकडील संपत्तीची माहिती दिली नव्हती. त्यामुळे आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. गेल्या वर्षी, निवडणूक आयोगाने किमान 154 लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व निलंबित केले होते, परंतु या सर्वांनी नंतर संबंधित तपशील सादर केला आणि त्यांचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. निवडून आलेल्या प्रतिनिधींनी प्रत्येक वर्षाच्या अखेरीस मालमत्ता आणि दायित्वे अनिवार्यपणे दाखल करण्याच्या नियमाकडे दुर्लक्ष केल्यानंतर पाकिस्तानच्या निवडणूक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

Advertisement

ज्या प्रतिनिधींचे सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे ते संसदीय कामकाजात सहभागी होऊ शकत नाहीत आणि त्यांनी संबंधित तपशील सादर करेपर्यंत त्यांचे सदस्यत्व निलंबित राहील, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानातील भ्रष्टाचार संपवण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढत आहेत. सत्ताधारी पक्षाला परदेशातून मिळालेल्या देणग्या जाहीर न करण्याचा आरोप त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून होत आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पण तरीही याबाबत सरकारने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.

Advertisement

निवडणूक आयोगाच्या तपास पथकाने या प्रकरणाचा अहवाल जारी केला असून त्यात ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सत्ताधारी पक्षाने निधीबाबत आयोगाला दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे अहवालात उघड झाले आहे. अहवालानुसार, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या स्टेटमेंटमध्ये असे दिसून आले आहे, की पक्षाला 1.64 अब्ज रुपये मिळाले होते, त्यापैकी 31 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा कोणताही हिशोब ठेवला गेलेला नाही.

Loading...
Advertisement

या प्रकारामुळे देशातील विरोधी पक्षांनी सरकारवर चौफेर टीका सुरू केली आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. आधीच पाकिस्तानवर अब्जावधींचे विदेशी कर्ज आहे. त्यात सरकारने नागरिकांना त्रास देणारे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे देशातील लोकही सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत.

Advertisement

पाकिस्तानला ‘त्याचा’ ही फायदा नाहीच..! तालिबान्यांकडूनही आता होतेय कोट्यावधींचे नुकसान; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply