भारीच.. देशाच्या साखरेची गोडी वाढली..! पहा, फक्त तीनच महिन्यात किती साखर पोहोचली विदेशात ?
नवी दिल्ली : विदेशातून सध्या भारतातील साखरेस मागणी वाढली आहे. परिणामी देशाच्या साखर निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत साखर निर्यात जवळपास चार पटीने वाढून 17 लाख टन झाली आहे. आतापर्यंत 38-40 लाख टन निर्यातीसाठी साखर कारखान्यांनी करार केले आहे. कारखाने आता पुढील करारांसाठी जागतिक किमतीत सुधारणा होण्याची वाट पाहत आहेत.
साखर विपणन वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर पर्यंत चालते. ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या कालावधीत सुमारे 17 लाख टन साखर निर्यात झाली आहे, असे इंडियन शुगर मिल असोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे. मागील वर्षात याच काळात सुमारे साडेचार लाख टन साखर निर्यात झाली होती. या महिन्यात सुमारे 7 लाख टन साखर निर्यातीसाठी उपलब्ध आहे.
असोसिएशनने म्हटले आहे, की ब्राजीलमध्ये आगामी हंगाम 2022-23 (एप्रिल-मार्च) मध्ये जागतिक कच्च्या साखरेच्या किमतीत आणखी घसरण झाली आहे आणि सध्या 5 महिन्यांत सर्वात कमी आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, भारतीय कारखाने वेळेची वाट पाहत आहेत आणि अजून 38-40 लाख टनांहून अधिक निर्यात करारांवर पुढील कार्यवाहीसाठी अद्याप काही निर्णय घेतलेला नाही.
इंडियन शुगर मिल असोसिएशनने सांगितले की, चालू 2021-22 वर्षात देशात 1 ऑक्टोबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत 151.41 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, जे मागील वर्षात याच कालावधीत 142.78 लाख होते.
असोसिएशनने सांगितले की, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 15 जानेवारी 2022 पर्यंत 58.84 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे, जे मागील विपणन वर्षाच्या याच कालावधीत 51.55 लाख टन होते. उत्तर प्रदेशातील साखरेचे उत्पादन 15 जानेवारीपर्यंत 40.17 लाख टनांपर्यंत कमी झाले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 42.99 लाख टन होते.
भारताच्या साखरेची ‘या’ देशाला गोडी; पहा कुठं झालीय सर्वाधिक निर्यात..!