दिल्ली : कोरोनाच्या घातक आजारने दोन वर्षात जगाचे मोठे नुकसान केले. या संकटात अनेक देश कर्जबाजारी झाले. कोट्यावधी लोक बेरोजगार झाले. गरीबी वाढली. महागाईचाही भडका उडाला. काही देशांच्या अर्थव्यवस्था अक्षरशः उद्धवस्त झाल्या. अशा भीषण संकटात जगातील देश सापडलेले असताना चीनवर मात्र या कोरोनाचा फारसा परिणाम झाला नसल्याचे आता स्पष्ट होत आहे. कारण, इतर देशांचा आर्थिक विकास कोरोनामुळे थांबला असला तरी या काळात चीनच्या अर्थव्यवस्थेने मात्र मोठी झेप घेतली आहे.
सन 2021 मध्ये चीनची अर्थव्यवस्था 8.1 टक्के दराने वाढली असून तब्बल 18 हजार अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास 18 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी ब्यूरोने दिलेल्या माहितीनुसार, चीनची अर्थव्यवस्था मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 4 टक्क्यांनी वाढली. तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत मात्र हे प्रमाण कमी आहे. तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था वाढीचा दर 4.9 टक्के होता. सरकारने 2021 साठी 6 टक्के दर निश्चित केला होता. मात्र, या उद्दीष्टापेक्षाही जास्त म्हणजे अर्थव्यवस्था 8.1 टक्के दराने वाढली. चीनी न्यूज एजन्सी शिन्हुआने याबाबत माहिती दिली आहे.
चीनमध्येही कोरोनाचे संकट होते. इतकेच काय तर कोरोना विषाणू सर्वात आधी याच देशात सापडला होता. मात्र, चीनने या आजाराची माहिती जगाला वेळेत दिली नाही. अगदी उशीराने माहिती दिली. तोपर्यंत हा आजार अनेक देशांत पोहोचला होता. यानंतर दोन वर्षात कोरोनाने जो धूमाकूळ घातला, नुकसान केले हे सर्वांनीच पाहिले. कोरोनास रोखण्यासाठी प्रत्येक देशाने आपापल्या परीने प्रयत्न केले. काही देशांना कोरोना नियंत्रित करण्यात यश आले. त्यामध्ये चीन आहे.
चीनने कोरोना अतिशय कठोरपणे नियंत्रित केले. येथील निर्बंध जगातील अन्य देशांच्या तुलनेत अगदीच कठोर होते. फक्त तीन रुग्ण सापडले म्हणून सगळ्या प्रांतात लॉकडाऊन टाकला जात होता. त्यामुळे चीनने या आजारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले. या काळात चीनच्या व्यापारातही मोठी वाढ झाली. त्याचा परिणाम म्हणून कोरोनाचे संकट असतानाही चीनने ही कामगिरी करुन दाखवली.
चीनी कंपन्यांना बसणार झटका..! देशात तयार होणार स्वस्त स्मार्टफोन; पहा, सरकारने काय केलेय ?